मुंबईतील कबुतर खान्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Cityline Media
0
मंत्रालय सिटीलाईन न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री.देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंत्रालय,मुंबई येथे कबुतर खान्याच्या प्रश्नासंदर्भात बैठक पार पडली.कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे,या तिनही बाबी महत्त्वाच्या आहेत.कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही,कबूतर खाण्याबाबत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करताना पर्यायी उपाययोजना करण्यात याव्यात.कबूतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्य पुरवठ्यावर निर्बंध आल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये,यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्य पुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर बैठकीत दिलेत.

या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार,वन मंत्री.गणेश नाईक,कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री. मंगल प्रभात लोढा, गिरीष महाजन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री, महाराष्ट्र राज्य आ. कालिदास कोळंबकर, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त. भूषण गगराणी, वन विभागाचे अपर मुख्य सचिव. मिलिंद म्हैसकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!