नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरीत नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात आई सापडल्याचा आरडा-ओरड शेतातून एकू येत असल्याने जनाबाईचा मोठा मुलगा जिवांच्या अकांताने त्यांना वाचवण्यासाठी शेतात शिरला. पण बिबट्याने जनाबाईची मान जबड्यात धरलेली असल्याने त्यांचा काही क्षणातच मृत्यू झालेला होता. हे चित्र पाहून मुलगा संजयचा थरकाप उडाला ते धाय मोकलून घटनास्थळावर रडत होते.जणू डोळ्यासमोर समोर अंधार पसरल्यागत म्लान चेहरा करून स्तब्ध होते. छाया रेखाकन-प्रकाश कदम
आई शेतात काम करण्यास गेलेली असताना संजय हे नुकतेच घरात येवून बसले होते. त्यांच्यासमोर त्यांची आई घरातून चहा घेवून शेतात गेली.पाच मिनिटांच त्यांना बिबट्याची डरकाळी आणि जनाबाईला बिबट्याने ओढून नेल्याचा कल्ला ऐकताच संजय बिबट्याच्या शोधार्थ त्वरीत शेतात गेले. बिबट्या जनाबाईला ओढत नेत असल्याचे दिसला.त्यांनी-
वनविभागाने अंत बघितल्यास जनप्रक्षोभक
दिंडोरी परिसरात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे रात्रीच काय दिवसा सुध्दा शेतात करणे अवघड झाले आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने बिबट्याच्या हल्ले प्रश्नी उपाययोजना करावी. तसेच नरभक्ष बिबट्याचा शोध घेवून त्यांना यमसंधनी पाठवावे.
रमेश बोरस्ते, सामाजिक कार्यकर्ते, दिंडोरी
-बिबट्याला हाकलून लावले आणि आईला उचलून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.परंतू मानलेला खोलवर जखम केल्याने जनाबाईचा
जागीच मृत्यू झालेला होता. ही घटना सांगतांना संजय बदादे हे ढसुढसु रडू लागले. त्यांच्याबरोबर उपस्थितांचे डोळे सुध्दा पाणावले.
सुनेच्या हातचा चहा आणि डोंगर कोसळला
रक्षाबंधन असल्याने जनाबाई बदादे ह्या घरीच होत्या. घरातील माणसे शेतातून आले. मोठा मुलगा संजय हे सुध्दा शेतातून आले होते. त्यावेळी जनाबाईची सुन विभाबाई संजय बदादे यांनी चहाबदल विचारले. त्यावेळी जनाबाईने सर्वांना चहा करायला सांगितले व मुलाही चहा द्यायला सांगितले. जनाबाईच्या सांगण्यानुसार सुनबाईने सर्वांना चहा दिला व मुलाही चहा दिला. जनाबाईनेही चहा पिला व त्यानंतर ती म्हणाली की मी शेतात जावून आले. पाचच मिनिटात बिबट्याने तिला जख्यात पकडले. त्यात ती ठार झाली.सासुबाईला दिलेला चहा हा शेवटचा ठरला. शेवटचा चहाची आठवण सांगतांना मयत जनाबाईची सून विभाबाईचा उमटता दाटून आला होता.