संभाजीनगर जिल्हाध्यक्ष व नवीन अध्यक्ष पदग्रहण सोहळा

Cityline Media
0
संभाजीनगर प्रतिनिधी शहरातील गांधी भवन,शहागंज येथे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून माजी अध्यक्षांची पदमुक्ती झाली.या प्रसंगी किरण डोणगावकर यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांच्याकडे जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली.
प्रसंगी जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.तसेच, माजी अध्यक्षांंसह जिल्ह्यातील अनेक नेत्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल शहर व जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ देखील पार पडला. या वेळी माजी अध्यक्षांनी उपस्थित राहून सत्कार स्वीकारला व सर्वांचे मन:पूर्वक आभार मानले.

कार्यक्रमास प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व मा. मंत्री अनिल पाटील, एम. एम. शेख, विलास बापू औताडे, शहराध्यक्ष शेख युसूफ नेते, प्रा.मोहन देशमुख, रवींद्र काळे.कमल फारुकी. लहुजी शेवाळे सरचिटणीस. संदीप ढवळे पाटील सरचिटणीस,डॉ.जफर खान सचिव,डॉ. सरताज पठाण . सागर साळुंके,जितेंद्र देहाडे, सय्यद अक्रम.,अशोक डोळस, राहुल सावंत, जगन्नाथ काळे भाऊसाहेब जगताप, राहुल सावंत,जिल्ह्यातील सर्व तालुका व शहराध्यक्ष तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!