संगमनेर प्रतिनिधी नितीनचंद्र भालेराव/दिपक कदम/दिनकर गायकवाड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा कोहिनूर ऑफ इंडिया या पुरस्काराने लंडन मध्ये नुकताच गौरव करण्यात आला.सुप्रसिद्ध उद्योजक वेदांता ग्रुपचे प्रमुख अनिल अग्रवाल आणि हिंदुजा ग्रुपचे प्रमुख संजय हिंदुजा यांच्या हस्ते ना.रामदास आठवले यांचा सन्मान करण्यात आला.एका अग्रगण्य वृत्तपत्राच्या वतीने कोहिनूर ऑफ इंडिया या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन लंडन मधील सवय या हॉटेल मध्ये आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक न्यायाच्या लढाई क्रांतिकारी योद्धे ठरलेल्या रामदास आठवले यांनी दलित, वंचित,गरीब,बहुजन वर्गाच्या सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी भारतात मोठे योगदान दिले आहे.ते भारतातील सामाजिक न्यायाच्या लढ्याचे मागील ५० वर्षांपासून नेतृत्व करत आहे.
ना.रामदास आठवले यांचे कर्तृत्व जगभरातील परिवर्तनवादी समतावादी कार्यकर्त्यांना प्रेरणादायी असल्यामुळे त्यांना कोहिनूर ऑफ इंडिया या पुरस्काराने लंडन मध्ये सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्रातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या एका वृत्तपत्राच्या वतीने कोहिनूर ऑफ इंडिया या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन लंडन मधील सवय या हॉटेलात आयोजन करण्यात आले होते.
यावेळी समूहाचे विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा उपस्थित होते.सुप्रसिद्ध उद्योजक वेदांता ग्रुप चे प्रमुख अनिल अग्रवाल आणि हिंदुजा ग्रुपचे प्रमुख संजय हिंदुजा यांच्या हस्ते ना.रामदास आठवले यांना कोहिनूर ऑफ इंडिया पुरस्कार सन्मान देण्यात आला.
यावेळी ग्लोबल इकॉनॉमिक कॉन्व्हेशनचे आयोजन करण्यात आले होते.अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष तथा अहिल्यानगरचे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांनी दिली.
