नाकोडे येथील अभिनव बाल विकास मंदिर शाळेत गड-किल्यांची नावे असलेले वर्ग

Cityline Media
0

नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील नाकोडे येथील अभिनव बाल विकास मंदिर येथे उपक्रमशील मुख्याध्यापक नितीन पाटील यांच्या संकल्पनेतून एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यालयातील १२ वर्गाना महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या गड किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत.
मुख्याध्यापक नितीन पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकापुरता इतिहास शिकू नये तर गड-किल्ल्यांच्या शौर्यगाथा त्यांच्या मनामनात जिवंत राहाव्यात.आपल्या वारशाचा अभिमान ठेवून विद्यार्थ्यांनी भविष्याकडे वाटचाल करावी,हीच या संकल्पने मागची भूमिका आहे.

या उपक्रमात विद्यालयातील सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विजय जाधव,अक्षय सोनवणे,उदय पाटील,प्रजेश मोरे,मनिषा पवार,सोनाली कड, सोनाली मगर,दिनेश कोर, योगिता खैरनार,वैशाली निकम आदी शिक्षकांनी आपापल्या वर्गांना सजवून आकर्षक फलक, चित्रफीत व माहितीपत्रके तयार केली. विद्याथ्यांनी देखील घोषवाक्ये, चार्ट्स व कलाकृतींच्या माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदविला. मविप्र संस्थेचे तालुका संचालक रविंद्र देवरे यांनी सांगितले.

की,शालेय स्तरावर असा उपक्रम राबविणे म्हणजे मुलांच्या मनावर आपल्या पराक्रमी इतिहासाची अमिट छाप उमटविण्याचे काम आहे.शालेय समितीचे अध्यक्ष, सदस्य च पालकवर्ग यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. इतिहास व शिक्षणाची सांगड घालणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे. हा आगळावेगळा उपक्रम शालेय शिक्षणात नवीन उर्जा निर्माण करणारा ठरला आहे. इतिहासातून प्रेरणा भविष्याकडे वाटचाल हा संदेश प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणारा ठरत आहे,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!