सिटीलाईन न्यूजच्या बातमीदारीने सार्वजनिक बांधकाम विभाग ॲक्शन मोडवर

Cityline Media
0
-पालकमंत्र्यांच्या आदेशाने कामाला सुरुवात 
-आश्वी खुर्द ते हनुमान वाडी रस्त्याचे लवकरच डांबरीकरण

आश्वी संजय गायकवाड लोकांसाठी..लोकक्रांतीसाठी.. सुरू झालेल्या सिटीलाईन वेब न्यूज पोर्टल आणि युट्यूब चॅनेल आपली सामाजिक बांधिलकी जपत आज जवळपास साडे तीन ‌लाख वाचकसंख्येचा टप्पा गाठला आहे,सिटीलाईन न्यूज पोर्टलच्या निर्भिड आणि दर्जेदार बातम्या वाचक आणि सर्वसामान्यांचा उन्नतीबिंदू ठरु पाहत आहे नुकतेच आश्वी खुर्द ते हनुमान वाडी रस्त्याबाबत सिटीलाईन न्यूज बातमी प्रकाशित केली होती आज पाच वर्षाचा हा जळता प्रश्न सुटला आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा.यांच्या आदेशाने सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची डागडुजी सुरू केली असून लवकरच या रस्त्याचे डांबरीकरण होण्याचे आश्वासन मिळाले आहे.
आश्वी खुर्द बाजारतळ ते हनुमानवाडी या केवळ ३ किमी रस्त्याची गेल्या पाच वर्षांपासून दयनीय अवस्था निर्माण झाली होती.डांबर उखडलेले,खडी उघडी पडलेली,पावसाळ्यात खड्डयात रस्ता आहे की रस्तात खड्डा हेच न कळणारी स्थिती झाल्याने या रस्त्यावरील प्रत्येक प्रवासी उद्विग्न अवस्थेत आपले वाहने चालवत असत त्यामुळे शेतकरी,विद्यार्थी,दूध टँकर व लालपरी रोज जीव धोक्यात घालून प्रवास करत होते.किरकोळ अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच होते.

ग्रामस्थांचा आवाज अखेर सिटीलाईन न्यूजने प्रशासनापर्यंत पोहोविला.आश्वी खुर्दच्या प्रथम महिला सरपंच सौ. अलका गायकवाड यांनी रस्त्याचा प्रश्न तत्काळ जनसेवा कार्यालयाकडे मांडला. नामदार राधाकृष्ण विखे  पा. यांचे स्विय सहाय्यक बापुसाहेब गायकवाड यांनी हा विषय थेट ना. राधाकृष्ण विखे पा. व डॉ. सुजय विखे यांच्यापर्यंत पोहोचवला.
पालकमंत्र्यांनी तातडीने प्रतिसाद देत सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश दिले.लगेचच खड्डे बुजवण्याचे तसेच डागडुजीचे काम सुरू केले असून लवकरच रस्त्याचे डांबरीकरण होणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

आश्वी खुर्द ग्रामस्थांनी या कार्यवाहीबद्दल नामदार राधाकृष्ण विखे पा.,डॉ. सुजय विखे पा.आश्वी खुर्दच्या सरपंच सौ.अलका गायकवाड बापुसाहेब गायकवाड व जनसेवा कार्यालयाचे यांचे आभार मानून सिटीलाईन न्यूजचे देखील आभार मानले आहेत.
                   छाया-प्रकाश कदम 
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!