जामखेड प्रतिनिधी तालुक्यातील जवळका येथे नुकतेच सटवाई मातेच्या पावन यात्रा उत्सवात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे सहभागी होत भक्तिभावाच्या वातावरणात सटवाई मातेचे मनोभावे दर्शन घेतले.
या वेळी,सटवाई माता मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विभाग अंतर्गत मंजूर झालेल्या रुपये ३ कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले.या भूमिपूजनामध्ये सभामंडप, भक्तनिवास, पाण्याची टाकी, संरक्षण भिंत, पेव्हिंग ब्लॉक, प्रसाधनगृह आणि जोड रस्ता बांधकाम यांसारख्या ग्रामविकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आणि अपेक्षित असलेल्या सुविधांचा समावेश आहे.
या सर्व प्रकल्पांमुळे भाविकांना धार्मिक कार्यांसाठी अधिक सोयीस्कर व सुसज्ज वातावरण मिळेल, तसेच ग्रामस्थांसाठी पायाभूत सुविधा अधिक सक्षम होतील
या प्रसंगी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष.रवींद्र सुरवसे, खर्डा गावच्या सरपंच सौ.संजीवनी पाटील,.नानासाहेब गोपालघरे,.बाजीराव गोपालघरे, सरपंच.भद्रेश काळे.पृथ्वीराज वाळुंजकर,.संतोष पाटील, सरपंच .सुभाष जायभाय, .उदयसिंह पवार, .महालिंग कोरे,.महेश बांगर,.बाळासाहेब गोपालघरे,.जयराम खोत यांच्यासह जामखेड तालुक्यातील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.