नाशिक दिनकर गायकवाड पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना जागतिक आदिवासी दिनानिमित्त तरतुदीनुसार खर्च करण्याची मुभा असल्याने यंदा आदिवासी दिनाला कार्यकत्यांचा उत्साह वाढणार आहे. याबाबत पेसा आराखड्याच्या पाच टक्के निधीमधून खर्च मिळणार आहे.
याबाबत दिंडोरी तालुक्यातील अंबानेरचे माजी सरपंच संतोष रहेरे यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामसेवकांना तसेच गावोगावच्या पेसा समित्यांना पुन्हा माहिती देण्यात आली आहे.
जागतिक आदिबासी दिनानिमित्त ग्रामपंचायत स्तरावर आदिवासी संस्कृतीत संवर्धन होण्यासाठी पेसा पाच टक्के अनुदानातून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी तरतूद पेसा निधीतून केली आहे. याबाबत हा निधी खर्च
करताना पैसा आराखड्यातील तरतुदीनुसार पेसा निधी करावा तसेच यापुढील पेसा ग्रामसभेत आराखडा तयार करताना ९ ऑगस्ट हा आदिबासीदिन साजरा करण्याबाबत तसेच आदिवासी समाजाच्या पुढील परंपरा व संस्कृतीचे दर्शन या विषयांसाठी नियमाप्रमाणे आवश्यक तरतूद करण्यात यावी. त्यास ग्रामसभेची मान्यता घेण्यात यावी तसेच आदिवासी उपाययोजनेच्या मूळ तत्त्वांना अनुसरून पेसा निधीचा वापर
सुस्पष्टपणे जनतेच्या कल्याणाकरता होईल, याची दक्षता घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत इतर कारणासाठी पेसा निधीचा वापर होणार नाही याची जबाबदारी घ्यावी, अशा सूचना गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी तालुक्यातील पेसा ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना दिल्या आहेत. संतोष रहेरे, गुलाब गांगोडे, मित्रानंद जाधव आदींनी गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करून आदिवासीदिन साजरा करण्याबाबत पार्श्वभूमी सांगितली.