नाशिक दिनकर गायकवाड संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध राहु, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांनी केले.
संपर्क कार्यालयाचे उद्घाटनवेळी ना.झिरवाळ बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक गणपतराव पाटील, माजी जि.प. उपाध्यक्ष प्रकाश बडजे, बाळासाहेब जाधव, विश्वासराव देशमुख, तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, दिंडोरीच्या उपनगराध्यक्षा माधुरी साळुंखे, नगरसेविका शैला उफाडे, कैलास मवाळ आदींच्या प्रमुख उस्थित झाले होते.
यावेळी ना. झिरवाळ यांनी ६ ते ७ तास कार्यालयात बसून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविले. यावेळी नागरिकांनी कार्यालयात प्रचंड गर्दी केली होती. स्वागत तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे यांनी
केले. युवानेते गोकुळ झिरवाळ यांनी आभार मानले. यावेळी परिक्षित देशमुख यांचा वाढदिवसानिमित्त ना. झिरवाळ यांच्या हस्ते अभीष्टचिंतन करण्यात आले. यावेळी कै. मधुनाना पोपटराव जाधव यांच्या स्मरणार्थ कै. मधुनाना जाधव मित्रमंडळ यांच्याकडून ना. नरहरी सिताराम झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्ट यांना रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका भेट देण्यात आली. याप्रसंगी बबन जाधव, माधवराव सांळुंखे, अविनाश जाधव, अशोक टाँगारे, कृष्णा मातरे, प्रतीक जाधव, दिपक
धुमणे, राहुल कावळे, अभिषेक देशमुख, सचिन गायकवाड, अनिकेत बोरस्ते, भारत खांदवे, जहीर शेख आदींसह राष्ट्रबादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.