कळवण दिंडोरी सिमेवरील गावे मोबाईल रेंज समस्याने परेशान
नाशिक दिनकर गायकवाड उत्तर महाराष्ट्रातील आराध्य दैवत कळवण दिंडोरी सिमेवर असलेल्या आणि सप्तशृंगगडाच्या पायथ्याच्या नांदुरी येथील भारत संचार निगम टॉवर,जिओ नेटवर्क असून नेटवर्कची कायमच समस्या निर्माण होत आहे. या समस्या सुटणार कधी? संबंधित विभाग याकडे लक्ष देतील का? संतप्त सवाल असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.त्यामुळे संबंधित
८ या टॉवरबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या असून यावरच बरेच काम अवलंबून असतात. परंतु नेटवर्क उपलब्ध होत नसल्याने काही शासकीय कामांनाही अडचण निर्माण होत असते. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे द्यावे.विभागाने नेटवर्कची समस्या कायमस्वरुपी दूर करावी,अशी मागणी येथील मोबाईल ग्राहकाकडून होत आहे.
नांदी येथे वैबरा बँक, माहिती व सुविधा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यलय,नेटबँकीग या ऑनलाईन सुविधा आहे.
यासाठी नेटवर्क असणे महत्वाचे आहे. परंतु गावात असलेल्या टॉवर असून सुध्दा नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे अनेकांना नेटवर्क रेंज नसल्याने हताश होऊन परत जावे लागते. याचाबत अनेकदा संबंधित विभागाशी संपर्क केला असुन या टॉवरला होणारा बीज पुरवठा हा थ्री फेज पाहिजे, परंतु तिथे सिंगल फेजच असल्याने पुरेशी बिज पुरवठा होत नसल्याने ही समस्या निर्माण झालेली असल्याचे समजते.
परंतु कायमच अशा पद्धतीने जर समस्या निर्माण होत असेल तर हा टॉवर नक्की कशासाठी आहे.म्हणजे टॉवर आहे नावाला अन.नेटवर्क नाही गावाला अशी म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी कायमच भाविकांचा राबता असतो. त्यांनाही या रेंज नसल्याने मोठी समस्या निर्माण होते.
जे मोबाईल धारक मोबाईलचा रिचार्ज करतात तो ही वाया जात असल्याचे ग्राहकांनी सांगितले. तरी संबंधित विभागाने नेटवर्कची समस्या कायमस्वरूपी दूर करावी, अशी मागणी होत आहे.माझा महा ई सेवा केंद्राचा व्यवसाय असून सध्या आधार कार्ड अपडेटचे काम सुरू आहे. परंतू रेंज नसल्याने अनेक वयोवृद्धांना व लहान बालकांना परत जावे लागते. प्रशासनाने या याकडे लक्ष घालण्याची गरज आहे.