पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली होमगार्ड जिल्हा कार्यालयात ध्वजारोहण उत्साहात

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड होमगार्ड जिल्हा कार्यालय नाशिक येथे ध्वजारोहण उत्सव पार पडला.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदित्य मिरखेलकर भापोसे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण तथा जिल्हा समादेशक होमगार्ड यांच्या मार्गदर्शनाखाली होम डी. वाय. एस. पी. नितीन कुमार (गोकावे) नाशिक ग्रामीण यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.
यावेळी होम डी. वाय.एस. पी. नितीन कुमार यांनी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ घ्यायला लावली, समाजामध्ये जनजागृती करण्याची प्रेरणा दिली. याप्रसंगी नाशिक जिल्हा होमगार्ड कार्यालयाचे प्रमुख प्रशासिक अधिकारी सुरेश जाधव, केंद्रनायक हारून तडवी,

पलटण नायक शांतीलाल निनावे, परेड कमांडर अभिमन्यू दैतकर, कंपनी नायक तथा समादेशक अधिकारी दिनेश पवार,वरिष्ठ पलटण नायक श्रीकांत जाधव, रमेश कळमकर, पलटण नायक तथा अंशकालीन लिपिक प्रशांत सुधाकर चौधरी, पलटण नायक सुमंत महाजन, विनय शिंत्रे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, तसेच सार्जंट गौतम जाधव, विनोद वानखेडे, छगन वाघ, संतोष शेलार, सुमन राऊत, नसरीन शेख, संगीता पगारे, भाग्यश्री जाधव, मेघमाला जाधव यांच्यासह १५० पुरुष व ६० महिला अशी संख्या होती. यावेळी कार्यक्रम शांततेत व शिस्तीत पार पडला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!