नाशिक दिनकर गायकवाड नाशिक जिल्ह्यातील वडनेर गावात शुक्रवारी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या आयुष भगत या चिमुरड्याची घटना ताजी असतानाच दिंडोरीमध्ये बिबट्याने वृद्ध महिलेवर हल्ला करत तिला ठार केले. -छाया रेखांकन-प्रकाश कदम
अलीकडच्या काळात नाशिक जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यातला हा पाचवा मृत्यू झाला. त्यामुळे बिबट्याची दहशत आणखी वाढली आहे. वेळी अवेळी, एकाकी रस्त्यावर फिरणे मुश्किल झाले असून याबाबत वन प्रशासनाने ठोस पावले उचलावी, अशी मागणी जोर धरत आहे. दिंडोरीत ही घटना घडल्यावर दिंडोरीमध्ये बिबट्याने वृध्द महिलेवर हल्ला करत तिला ठार केल्याने संतप्त नातेवाईकांनी दिंडोरी वनविभागाच्या कार्यालयासमोर पार्थिव ठेवत नाशिक सुरत महामार्गावर अडीच ते तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.
संतप्त नातेवाईकांनी दिंडोरी वनविभागाच्या कार्यालयासमोर पार्थिव नेवून ठेवले. तसेच नाशिक-सुरत महामार्गावर अडीच ते तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. दिंडोरी येथील बदादे वस्तीवरील जनाबाई जगन बदादे (६५) ही वृद्ध महिला घरापासून
काही अंतरावर शनिवारी (दि. ९) दुपारी ४ वाजेच्या सुमारास आपल्या शेतातील कोथिंबीर काढत असताना पाठीमागून येत बिबट्याने महिलेवर झडप घातली. बिबट्याच्या डरकाळीने व जनाबाई बदादे यांच्या ओरडण्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. जनाबाईचा मोठा मुलगा संजय बदादे हे बिबट्याच्या शोधात उसाकडे पळाले. त्यात बिबट्या जनाबाईला तोंडात घेऊन चाललेला दिसला.यामुळे या परिसरात बिबट्याची दहशत कायम झाली आहे.