क्रेडाई नाशिक आयोजित प्रॉपर्टी एक्सपो २०२५ ला शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट

Cityline Media
0
नाशिक प्नतिनिधी शहरातील ठक्कर डोम येथे 'क्रेडाई' नाशिकच्या वतीने आयोजित प्रॉपर्टी एक्स्पो- २०२५ ला शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उपस्थित दर्शवुन एक्स्पोला शुभेच्छा दिल्यात.तसेच यावेळी उपस्थितांशी संवाद साधला.
नाशिकमध्ये होत असलेला हा एक्स्पो महाराष्ट्रातील सर्वात मोठा एक्स्पो आहे,यात शंका नाही नाशिकच्या वैभवात यामुळे भर पडली आहे.नाशिक जिल्ह्यात उद्योग-व्यवसायासाठी पोषक वातावरण आहे. जलदगतीने होणारी पायाभूत सुविधा विकासाची कामे या सर्व गोष्टींमुळे नाशिकमध्ये गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध आहे. 

नाशिकच्या नैसर्गिक सौंदर्याचा, स्वच्छ हवा आणि हरित परिसर जपत विकास करणे ही आपली जबाबदारी आहे.ऊर्जा-बचत करणारी इमारती, सौरऊर्जा वापर,पावसाचे पाणी साठवणूक, कचरा व्यवस्थापन या बाबींवर भर दिला पाहिजे असे यावेळी त्यांनी सांगितले. 

प्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमे,क्रेडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर, रंजन ठाकरे, शाम साबळे, कुणाल पाटील, दिगंबर मोगरे आदि मान्यवर उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!