नाशिक दिनकर गायकवाड राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शहरातील ७७ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.यामध्ये रस्ता काँक्रिटीकरण, व्यायाम शाळा,सभामंडप यासह विविध विकास कामांचा समावेश आहे. ही सर्व विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावी,अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
प्रसंगी येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर,शहर अभियंता राजेंद्र सुतावणे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एच. बी.चव्हाण यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
विकास पुढीलप्रमाणे- शहरातील बादापूर रोड भागातील बदापूर रोड ते साईबाबा मंदिर पाठीमागील बाजूपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व भूमिगत गटार करणे कामाचे भूमिपूजन (र.रु. २५ लक्ष), शहरातील पारेगाव रोडवरील स. नं. १०६/११ दत्तमंदिराजवळ सभामंडप बांधणे कामाचे भूमिपूजन (२.रु.२० लक्ष), शहरातील पारेगाव रोड येथे दत्त मंदिराजवळ व्यायाम शाळेचे बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन (२.रु.१० लक्ष), तसेच शहरातील विशाल परदेशी यांच्या घरासमोरील रस्ता काँक्रिटीकरण करणे (र.रु. २२ लक्ष) असा सामावेश आहे.
