आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी पंचक्रोशीत बँकिंग क्षेत्रात आपल्या कार्य आणि विश्वासार्थ म्हणून अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या येथील आश्विनी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी पिंप्री लौकी अजामपुरचे व्यवहारी व्यक्तिमत्व भाऊसाहेब लक्ष्मण लावरे यांची नुकतीच बिनविरोध निवड होऊन सभागृहात उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी संस्थेच्या सभाग्रहात पंचायत समितीचे मा. सदस्य निवृत्ती सांगळे, संस्थेचे अध्यक्ष लष्कर सुभेदार संपतराव सांगळे, मा उपाध्यक्ष तुळशीराम म्हस्के, संचालक हरीभाऊ ताजणे, राजेंद्र गिते,सखाहरी नागरे,वसंत वर्पे,श्रीमती. पुष्पाभवर, सौ. कल्पना बोंद्रे, जेहूर शेख, डॉ. बालोटे,भगवान खामकर, तसेच व्यवस्थापक बाळासाहेब डहाळे व सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी दिलीप चतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी भाऊसाहेब लावरे यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
“भाऊसाहेब लावरे यांच्या निवडीमुळे आश्विनी पतसंस्थेच्या प्रगतीला नवे बळ मिळेल. सभासदांच्या अपेक्षांना न्याय देणारे नेतृत्व मिळाले आहे,” अशा शब्दांत उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.
या निवडीमुळे पिंप्री लौकी अजमपुर व आश्वी पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून,सर्वत्र भाऊसाहेब लावरे यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा. मा. मंत्री आण्णासाहेब म्हस्के मा. खा.डॉ. सुजय विखे डॉ. राजेंद्र विखे पा. सौ.शालिनी विखे पाटील यांनी देखील श्री लावरे यांचे अभिनंदन केले.
