राज्यस्थानातून मागविली पुंजाआई मातेची अमोघ मुर्ती
आश्वी संजय गायकवाड नेवासा तालुक्यातील देवगडचे संत किसनगिरीबाबा यांच्या गुरुभगिनी प.पू. बालब्रह्मचारी शिवभक्त साध्वी पुंजाआई माता यांच्या नेवासा तालुक्यातील पुनतगाव जन्मभूमी येथे उभारलेले भव्य मंदिर भक्तांसाठी लवकरच खुले होणार आहे.या मंदिराचा जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा बुधवार दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी अत्यंत भक्तिभावाने पार पडणार आहे.
नुकतीच राजस्थान येथून साध्वी पुंजाआईंची भव्य मूर्ती पुनतगावात दाखल झाली. मूर्तीचे प्रथम दर्शन घेऊन श्री. क्षेत्र देवगड मठाचे पीठाधीश्वर भास्करगिरी महाराज यांनी पूजन केले व स्वागत केले.
हे मंदिर पुर्ण होण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह,आठवडे भाजीपाला बाजार,विवाह यात दान मागुन १ रुपया पासुन वर्गणी गेली अखंड वीस वर्षापासुन अखंड अविरत स्वंयसेवकांनी जमा करत आज मितीला हे मंदिर पुर्ण झालेले आहे असे बाळू महाराज पंडुरे यांनी सांगितले यासाठी श्रीहरी पंडुरे यश पाटोळे रविंद्र पंडुरे किरण पंडुरे तनिष्क तागड तसेच स्वाध्वी पुंजामाई भक्त परिवार सहकार्य करत असल्यानेच हे मंदिर खऱ्या अर्थाने उभे राहीले.
मुख्य दिवशी सकाळी ९ ते १२ या वेळेत महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांचे किर्तन होणार असून त्यानंतर भास्करगिरी महाराजांच्या हस्ते पुंजाआईंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंढुरे मळा,पुनतगाव,गोणगाव रोड,पाचेगाव, ता.नेवासा, येथे बुधवार,८ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यास
सर्व भाविकांनी उपस्थित राहून तन,मन,धनाने सहकार्य करावे.असे आवाहन मंदिर सोहळा संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे साध्वी पुंजाआई माता मंदिर हे समाजात भक्ती,सेवा आणि त्यागाचा दीपस्तंभ ठरेल,असा विश्वास येथील भक्तांनी व्यक्त केला.
-पुंजाआईची कर्मभूमी आश्वीत लवकरच चौथे मंदिर
शिव भक्त बाल ब्रम्हचारी पुंजाआई माता यांचे देवगड जवळील बकु पिंपळगाव येथे एक प्रवरा संगम देवरे वस्ती येथे दुसरे आईंच्या जन्मभुमी असलेल्या पुनतगाव येथे हे तिसरे मंदिर पुर्ण झाले असुन तर पुंजाआई याची कर्म भुमी असलेल्या संगमनेर तालुक्यातील आश्वी येथेही चौथे भव्य असे मंदिर उभे राहात आहे
