संगमनेर प्रतिनिधी कृषीन्नोती प्रवरेच्या खोऱ्यातील चिंचपूर येथे ९ सप्टेंबर १९६७ साली कौतिक पाटीलबा तांबे यांचा जन्म झाला, गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून त्यांचा ज्ञानार्जनाचा प्रवास सुरू झाला तो ५ सप्टेंबर २०२५ रोजी शासनाच्या नियत वयोमानानुसार राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा.यांच्या हस्ते लोणी संगमनेर रोड वरील चिंचपूर येथील सप्तपदी लॉन्स येथे सकाळी १०.३० वा.त्यांचा सेवापुर्ती सन्मान करुन थांबविण्यात येत असला तरी तरी के.पी.तांबे सरांचे रसिक मन नवे नवे अनुभव घेतच आहे.
राज्यातील मानाचे आणि सन्मानाचे समजले जाणारे विविध क्षेत्रातील जवळपास १० पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहे उत्तम फोटोग्राफी,सर्वाकृष्ठ चित्रकला,विज्ञान गणित कला प्रदर्शन मध्ये सलग दहा वर्ष उत्कृष्ट शैक्षणिक साहित्य निर्मिती बद्दल शिक्षक गटामध्ये प्रथम क्रमांक त्यांनी प्राप्त केला आहे यात त्यांचे विशेष प्राविण्य असुन के.पी.तांबे सर म्हणून त्यांचा विशेष नावलौकिक आहे.
राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील महात्मा फुले विद्यालयातील माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन सर्वात्तम गुणांनी बारावी परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संगमनेर येथील शासकीय अ.वि.शिक्षणशास्त्र परिक्षा उत्तीर्ण होऊन संगमनेर तालुक्यातील न्याहारवाडी(खांबे येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रथम नियुक्ती झाली पुढे जिल्हा परिषदेच्या चणेगाव,जाधव वस्ती (पानोडी),लवणवाडी(तुळापूर) आश्वी बुद्रुक,चिंचपूर आणि अंतिमतः निमगाव जाळी असे ज्ञानदान करत त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले अनेकांना बालवयातच जगाचे ज्ञान देण्यास के.पी.तांबे सर पुर्णपणे यशस्वी झाले.
या नियोजित सेवापुर्ती सोहळ्याचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे मा.सदस्य अण्णासाहेब भोसले तर जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा सौ.शालिनी विखे पाटील मा.खासदार सुजय विखे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे मा.अध्यक्ष कैलास तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी सर्व स्नेही मित्र परिवार कला क्षेत्रातील मित्र विद्यार्थी पालक शिक्षक,पदाधिकारी यांनी उपस्थित राहवे असे आवाहन व्यवस्थापक शिक्षक संजय उंबरकर,रमेश सिनारे,शरद थेटे, मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद प्रवरा माध्यमिक विद्यालय चिंचपूर जि.परिषद शाळा चिंचपूर,निमगाव जाळी,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आश्वी, महात्मा फुले विद्यालय दाढ बुद्रुक,आश्वी बुद्रुक केंद्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.