लंडन येथे भारतीय वृत्तपत्राकडून ‌कोहिनूर ऑफ इंडिया पुरस्कार ना.राधाकृष्ण विखे पा.यांना प्रदान

Cityline Media
0
लंडन,युनायटेड किंगडम सिटीलाईन मिडिया नेटवर्क महाराष्ट्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या वृतपत्र समूहाच्या वतीने लंडन येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल इकॉनोमिक कनव्हेन्शन या जागतिक परिषदेत ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ हा पुरस्कार प्रदान करत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा.यांचा सन्मान सन्मान करण्यात आला. विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते सपत्निक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
                    छाया रेखांकन-प्रकाश कदम 
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे अभिनेते सुनिल शेट्टी, वृतपत्र समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा,. ऋषी दर्डा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.या सन्मानाबद्दल बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की या वृतपत्र समूहाचा मी मनापासून आभारी आहे ! भारताचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी,केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह, राज्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या संधीमुळे राज्याच्या आणि अहिल्यानगरच्या विकासात्मक प्रक्रीयेत योगदान देता येत आहे. आजपर्यत केलेल्या कार्याचा आणि माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहणाऱ्या प्रत्येकाचा हा सन्मान आहे,असे मी मानतो.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जनतेनं मला सलग आठ वेळा विधानसभेत काम करण्यासाठी दिलेल्या पाठबळामुळे या सन्मानाची संधी मला मिळाली,त्यामुळे मिळालेला सन्मान त्यांना समर्पित करीत आहे  असे मत राधाकृष्ण विखे पा.यांनी यावेळी व्यक्त केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!