उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीच्या मेळाव्यासाठी संगमनेरला येणार

Cityline Media
0
संगमनेर नितीनचंद्र भालेराव राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे विधानसभा निवडणुकीत आमदार अमोल खताळ यांच्या रूपाने शिवसेनेचा भगवा फडक ल्यानंतर प्रथमच संगमनेरात येत आहे.त्यामुळे शिवसेना महायुतीच्या वतीने त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे.त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जाणता राजा मैदानावर रविवारी दुपारी ४:०० वाजता महाविजय मेळावा होणार आहे.               छाया रेखांकन प्रकाश कदम 
जाणता राजा मैदानावर  होणाऱ्या महायुतीच्या महा विजय मेळाव्यास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे,राज्याचे पर्यटन मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे संपर्क मंत्री शंभुराजे देसाई,शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे,मा.खासदार डॉ.सुजय विखे,नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यासह इतर महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आमदार अमोल खताळ पाटील आणि महायुती जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन होणार आहे.त्यानंतर सजविलेल्या रथातून रॅलीद्वारे उपमुख्यमंत्र्यांची मिरवणूक काढून रोड शो करण्यात येणार आहे.ही मिरवणूक नवीन अकोले रोड बसस्थानक नवीन नगर रोड वरून राजपाल कॉर्नर मार्गे जाणता राजा मैदानावर जाणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!