पाच वर्षांपासून रस्ता दयनीय अवस्थेत,शेतकरी,विद्यार्थी,दुध वाहने व लालपरीचा प्रवास संकटात;प्रशासन मुग गिळून गप्प
आश्वी संजय गायकवाड भ्रष्टाचारच जणू शिष्टाचार व्हावा की काय असा प्रत्यय येतोय आश्वी खुर्द बाजारतळ ते हनुमानवाडी या केवळ ३ किमी रस्त्यांच्या झालेल्या अवस्थेमुळे गेल्या पाच वर्षांपासून या रस्त्याची दयनीय स्थिती निर्माण झाली असून,आज ती जीवघेणी ठरू पाहत आहे.एकेकाळी ‘आग्रा हायवे’ म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता आज ‘मृत्यूचा साक्षात सापळा’ झाला आहे.
रस्त्याची अवस्था चिंताजनक डांबरी रस्ता पूर्ण उखडलेला, खडी उघडी पडलेली, साईट पट्टे गायब, तर पावसाळ्यात खड्डा आहे की रस्ता हेच समजत नाही. या रस्त्यावर आश्वी गाव आणि पंचक्रोशीतील तब्बल ३० टक्के लोकवस्ती असून,शेतकरी, शालेय विद्यार्थी,दुध वाहतूक करणारे अवजड वाहने तसेच जिल्ह्याकडे कडे धावणाऱ्या लालपरी यांना रोजच्या प्रवासात जीव मुठीत धरावा लागतो.शेतकरी व उद्योजकांचे हाल हनुमानवाडी शेजारीच उद्योजक सागर गिते यांनी ‘गिते ॲग्रो मिल्कचे न्याय डेरी हा मोठा उद्योग उभा केला आहे. परिसरातील शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा,तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने सुरू झालेला हा उद्योग या रस्त्यामुळे मोठ्या अडचणीत सापडला आहे.दुध वाहतूक करणारे टँकर वारंवार खड्ड्यात अडकतात, वेळेवर पोहचण्यात अडथळा निर्माण होतो तर विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक जीव मुठीत धरून हा धोक्याचा प्रवास करत आहे.
दररोजच्या प्रवासात लहानमोठे अपघात नित्याचेच झाले असून, वृद्ध नागरिक व शालेय विद्यार्थी जीव धोक्यात घालून प्रवास करतात ते फारच चिंताजनक आहे.याबाबत सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठल मोरे यांनी बोलताना सांगितले की, “या रस्त्यावरून खड्डे चुकविताना माझा दोनदा अपघात झाला आहे.
आश्वी खुर्दच्या राजकारणात प्रभावी वर्चस्व असणारे दिग्गजाची घरे या रस्त्यावर असूनही जर या रस्त्याची ही अवस्था चिंताजनक असेल,तर सर्व सामान्य नागरिकांची कोण दखल घेणार?”असा प्रश्न उपस्थित होणे सहाजिकच आहे याबाबत नेते व पदाधिकारी गप्पच!
आश्वी खुर्द परिसरातील सर्व प्रमुख राजकीय व्यक्ती विविध संस्थाचे प्रमुख पदाधिकारी व त्यांचे घरे रस्त्यावर आहे असे असतानाही या रस्त्याचा प्रश्न आजवर कोणीही ठामपणे हाताळलेला नाही हे दुर्दैवी असल्याचे येथील त्रस्त जनता बोलताना दिसते “अहिल्यानगर–मनमाड महामार्ग महाराष्ट्रातील सर्वात खराब रस्ता म्हणून बदनाम झाला,पण आश्वी खुर्द–हनुमानवाडी रस्ता तर त्याहूनही चिंताजनक अवस्थेत गेला आहे,” अशी प्रतिक्रिया येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार सोनवणे यांनी दिली.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा.यांना ग्रामस्थ साकडे घालणार.
प्रशासनाला जाग येणार का?या रस्त्यामुळे दररोज शेकडो नागरिकांचे हाल होत आहेत. ग्रामस्थांनी आता हा प्रश्न थेट राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. व युवा नेते डॉ.सुजय विखे पा.यांच्याकडे मांडण्याचा निर्णय घेतला आहे.“आता तरी प्रशासनाने जाग यावी,अन्यथा उद्या एखाद्या निरपराधाचा बळी गेल्यावर जबाबदार कोण?” हा जळता प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.