नाशिक दिनकर गायकवाड मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात भगवा दहशतवाद ही काल्पनिक संज्ञा तयार करून तिच्या भोवती सर्व तपास केंद्रित करून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याच्या प्रयत्नाला न्यायालयाने चपराक दिल्याबद्दल मखमलाबादला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते ज्ञानेश्वर काकड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी बोलताना त्यांनी हिंदू धर्म व भारतीय सेनेला बदनाम करण्याचा कट न्यायालयाने उध्वस्त केला.साधू,साध्वी, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यां सोबतच भारतीय सेनेच्या दोन अधिकाऱ्यांना यामध्ये गोवण्यात आले होते. असे प्रतिपादन करून या निकालाबद्दल सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी मा.नगरसेवक पुंडलीक खोडे, दामोदर मानकर, संजय गामणे, माजी सैनिक रमेश बाबा काकड, योगेश्वर जेजुरकर यांच्यासह राम काकड, ज्ञानेश्वर कचू काकड विश्वनाथ मानकर, कारभारी, गायकवाड, मुन्ना मणियार, गणपत काकड, बाळासाहेब काकड, सुभाष काकड, बाळासाहेब रोकडे, सुदाम घुगे, संपत कातकाडे, अनिल लहामगे, सुभाष श्रीवास्तव आदिंसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून लाडू वाटून जल्लोष केला.