मागासवर्गीय विद्यार्थ्याकडून डोनेशनच्या नावाखाली रकमा उकळणाऱ्या महाविद्यालयाची मान्यता रद्द करा-बुधाभाऊ साळवे
नाशिक दिनकर गायकवाड अनुसूचित जाती, मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयावर फौजदारी गुन्हे दाखल दाखल करून त्यांची मान्यता करण्यात यावी असे महाराष्ट्र शासनाने परिपत्रक जारी केले आहे तरी शासन नियमाची पायमल्ली करून अनेक संस्थानिक विद्यार्थी,पालक वर्गाकडून डोनेशन या गोंडस नावाखाली रकमा उकळण्याच्या शर्यतीत जुंपले आहे.अशा महाविद्यालयांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी नाशिक येथील बुधाभाऊ साळवे यांनी प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण यांना निवेदन देऊन केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की शासन निर्णय/परिपत्रकान्वये अनुसूचित जातीच्या विदयार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क वसूल करु नये,तसे आढळल्यास संबंधीत महाविदयालयांविरुध्द फौजदारी कार्यवाही करण्यात येईल.असे नमूद आहे
त्याअनुषंगाने अन्वये नोटीसमध्ये नमूद सर्व विदयापीठे,महाविदयालय,सर्व प्राचार्य यांना समाज कल्याण मार्फत सक्त आदेश देण्यात यावेत,जे प्राचार्य,मुख्याध्यापक शाळा महाविदयालय विदयार्थ्यांकडून शासकीय नियमांच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची फी वसूल करतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करुन त्यांची मान्यता रद्द करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयापुढे तीव्र आंदोलन छेडले जाईल असे नमूद केले आहे.
नाशिक जिल्ह्यासह धुळे जळगांव नंदुरबार अहिल्यानगर विभागातील तमाम अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून सर्व मान्यता प्राप्त कनिष्ट महाविद्यालय, महाविद्यालय व विद्यापिठातील प्राचार्य, अध्यक्ष, सचिव,संचालक,
व्यवस्थापक,यांनी लोकसेवक पदाचा दुरूपयोग करून शैक्षणिक प्रवेश फी, परिक्षा फी,ॲडमिशन फॉर्म /अर्ज फी, शिक्षण /प्रशिक्षण फी सह सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण लाभा करिता विविध प्रकारचे आर्थिक लुट व फसवणुक केली असल्याने सदरची सर्व फी ३० दिवसांचे आत सर्व
अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना देण्यात यावी.याकरिता आम्ही शासन निर्णय परिपत्रक २००४ व २००६ नुसार महसूल आयुक्त, नाशिक विभाग,प्रादेशिक उपआयुक्त समाजकल्याण विभाग यांना बजावलेल्या अंतिम
नोटीसीची गांभीर्याने दखल घेवुन नाशिक विभाग प्रादेशिक उपआयुक्त समाजकल्याण विभाग नाशिक यांनी नाशिक,धुळे, जळगांव,नंदुरबार व अहिल्यानगर मधील,नाशिक विभागातील सर्व जिल्हा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयांना नोटीस बजावुन
सदरची रक्कम एक रकमी परत करण्यासाठी व संबंधीत विद्यापिठे,महाविद्यालय यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी व मान्यता रद्द करण्यासाठी आमचे सदर नोटीसीची गांभीर्याने दखल घेतली आहे सर्वअनुसूचित जाती,जमाती, मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी व
विद्यार्थीनींनी व त्यांचे पालकांनी या पुर्वी वरील प्रकारची सर्व शैक्षणिक फी भरल्याचे पावतीचे झेरॉक्स प्रती बुधाभाऊ साळवे यांना ९८९० ६२०६१० या व्हाट्सअपवर तात्काळ पाठवाव्यात.असे आवाहन श्री.साळवे यांनी केले आहे.निवेदनाच्या प्रती प्रादेशिक उपायुक्त,समाज कल्याण विभाग, नाशिक,आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना देण्यात आल्या आहेत.
