नाशिक दिनकर गायकवाड कळवण येथील एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याने नुतन पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
कळवण एज्यु के शन सोसायटीच्या विश्वस्त मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत विश्वस्त मंडळाच्या १३ जागांसाठी २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीच्या अखेरच्या दिवशी १३ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी ॲड भगवान पगार यांनी केली. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डॉ. रावसाहेब शिंदे, उपाध्यक्ष हर्षवर्धन पवार, सरचिटणीस भूषण पगार, विश्वस्त राजेंद्र भामरे, अरुण पगार, सुधाकर पगार, प्रवीण संचेती,
गजानन सोनजे, रघुवीर महाजन, हेमंत बोरसे,ॲड. दीप सोनवणे या विद्यमान विश्वस्त मंडळाबरोबर मा.विश्वस्त डॉ. पोपट पगार, मा.सरपंच हरी पगार या दोघांना नव्याने संधी मिळाली आहे. माघारीच्या अखेरच्या दिवशी विश्वस्त मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न होऊन त्यात प्रयत्न करणाऱ्या सर्वांना यश आल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. शेतकरी नेते संजय वाघ, मानूरचे सुनील पवार, मा.सरपंच जयंत पवार, प्रतिष्ठित व्यापारी योगेश महाजन, योगेश शिंदे, किरण पगार, कळवण सोसायटीचे अध्यक्ष किरण पगार, साहेबराव पवार, हिरामण पगार, रोहन आहेर, डॉ.पंकज पगार, दिलीप पगार या १३ इच्छुक उमेदवारांनी माघार नोंदवल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली.
