तांदळाच्या पिंडीचा स्तंभ दर्शनासाठी लाखों भाविकांची हजेरी
ओतूर समीर गाढवे जुन्नर तालुक्यातील मांडवे नदीच्या किनाऱ्यावर स्थित असलेले ओतूर गाव हे ऐतिहासिक गाव आहे या गावामध्ये केशव चैतन्य बाबाजी चैतन्य यांची संजीवनी समाधी या समाधीच्या खालच्या बाजूला कपलदिकेश्वर महादेवाचे मंदिर आहे या देवाची यात्रा श्रावण महिन्यामध्ये असते आजही श्रावण महिन्यात येथे भाविकांची अलोट गर्दी दिसून येत आहे.
यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे श्रावण मासाच्या प्रत्येक सोमवारी या महादेव मंदिरात तांदळाच्या पिंडी तयार होतात या पिंडी कलात्मक स्वरूपाने तयार केल्या जातात.
पिंडीचे निर्माण हे श्रावण मासातील प्रत्येक रविवारी गावातील श्रद्धाळू महिला भक्त भावाने हे तांदूळ गावातून मिरवून मांडवे नदीच्या पात्रातून धुवून या मंदिरामध्ये अर्पण करतात
रात्री दहा वाजता मंदिर बंद होते व बाराच्या सुमारास या पिंडीची वैदिकाद्वारे निर्माती होते.या पिंडींचे स्वरूप म्हणजे या पिंडी दही हंडीच्या मडक्याप्रमाणे आकाराच्या व एकावर एक अशा स्वरूपाचे असतात.
प्रत्येक पिंडीच्या मध्यात एक लिंबू स्थित असते या पिंडी प्रति सोमवार एक अशा प्रत्येक श्रावणी सोमवार मध्ये एक पिंड तयार होते.
पिंडींच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने दर श्रावणी सोमवारी भक्त येतात तिसऱ्या सोमवारी यात्रेनिमित्त मोठ्या कुस्त्यांचा आखाडा भरला जातो राज्यभरातून देशभरातून पैलवान येऊन आपले तुल्यबळ या ठिकाणी दर्शवतात या ठिकाणचे प्रमुख आकर्षण आहे.
