नशेत खालचे चुंचाळे परिसरात पत्नीचा खून करणाऱ्या पतीने केली आत्महत्या

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड येथील चुंचाळे एमआयडीसी पोलीस चौकीच्या हद्दीतील खालचे चुंचाळे परिसरात घडलेल्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती.कौटुंबिक वादातून पतीने झोपलेल्या पत्नीचा गळा उपरण्याच्या सहाय्याने आवळून खून केला व त्यानंतर स्वतः घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर तीन चिमुकली मुले आई-वडिलांच्या मायेपासून वंचित झाली आहेत.
                    छाया रेखांकन-प्रकाश 
याबाबत अधिक माहिती अशी, की अंबड येथील खालच्या चुंचाळे परिसरातील हनुमान मंदिराजवळील मनपा शाळेच्या मागे लहानशा भाड्याच्या घरात चेतन माडकर (वय ३३) व पत्नी स्वाती चेतन माडकर (वय २७) तीन मुलांसमवेत राहत होते. घटनेच्या वेळी घरात मुलगा व मुलगी हे दोघेच होते. मधला मुलगा घरामागे राहत असलेल्या

आजीच्या घरी होता. घरगुती भांडणातून मद्याच्या नशेत असताना मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास चेतनने पत्नी स्वातीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर घरातील छताच्या अँगलला गळफास घेऊन त्यानेही जीवन संपविले.

चेतन हा पंचवटीतील फुलेनगर परिसरात राहत होता. रिक्षा चालवून तो उदरनिर्वाह करत होता. नवरा बायकोमध्ये सतत होणाऱ्या भांडणामुळे स्वाती ही फुलेनगर येथील चेतनचे घर सोडून चुंचाळे

येथे आईसमवेत राहत होती; मात्र त्यांच्यातील वाद काही दिवसांपूर्वीच मिटल्यामुळे ती काही दिवसांपासून आईच्या घरामागे असलेल्या स्वतंत्र खोलीत चेतनबरोबर भाड्याने राहत होती. दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये पुन्हा वाद झाले असल्याचे समजते. स्वाती घराजवळच एका खासगी कंपनीत काम करून तीन मुलांचा सांभाळ करत होती; मात्र सोमवारी मध्यरात्री दारूच्या नशेत हा अनर्थ घडला असल्याची माहिती समोर येत आहे.

या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. निरपराध मुलांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, चेतनवर चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!