आश्वी पंचक्रोशीत सायबर भामटे सक्रिय

Cityline Media
0
डाॅ. सविता सोमाणी’ नावाने मेडिकल व्यावसायिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न 

आश्वी संजय गायकवाड राष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावर तांत्रिक झोलझाल करणाऱ्या सायबर भामट्यांनी आता 
ग्रामीण भागात  देखील उच्छाद मांडत थेट आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींनाच लक्ष्य करण्याचा फंडा शोधला आहे.नुकतेच  संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरातील पाच मेडिकल व्यावसायिक व एका प्रतिष्ठित डॉक्टरांना फसवण्यासाठी संशयितांचे लगातार फोन आले.
“मी डाॅ.सविता सोमाणी, प्राथमिक आरोग्य केंद्रातून बोलतेय.बाळ मरण पावलेय,तातडीने ४,५०० रुपये ऑनलाइन पाठवा…” – असा भावनिक डाव रचून महिला सायबर भामट्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला.

एकाने माणुस्कीतून पैसे दिले… पण नंतर शहानिशा केल्यानंतर समजले की ही चक्क फसवणूक आहे.
सायंकाळी ९ ते ११ या वेळेत हा प्रकार घडला.एक मेडिकल व्यावसायिकाने माणुसकीच्या भावनेतून स्वतःकडे पैसे नसतानाही दुसऱ्याकडून उधार घेऊन संबंधित क्यूआर कोडवर रक्कम ट्रान्सफर केली.पण नंतर पाठवलेला “माणूस” परत न आल्याने त्याला फसवणुकीचा संशय आला.तर इतर काहींनी तत्परता दाखवत माहिती पडताळली.

निमगाव जाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘डाॅ. सविता सोमाणी’ नावाचे कोणतेही डॉक्टर कार्यरत नसल्याचे समोर आले.त्यामुळे मोठी फसवणूक टळली.
सायबर चोरांची बोलण्याची शैली अगदी डॉक्टरांसारखी
भामट्यांनी व्हॉट्सॲपवर “भारत पारसमल शाहा” नावाचा क्यूआर कोड पाठवला.

आवाज,भाषा आणि बोलण्याची पद्धत इतकी पटणारी होती की समोरच्याला डॉक्टरच बोलत आहेत असा भास होत होता.याआधीही घडलेले प्रकार असेच काहीतरी आहे.जून महिन्यात या भामट्यांनी ग्राहक सेवा केंद्र चालकाची तब्बल १८ हजार रुपयांनी फसवणूक केली होती.

आश्वी खुर्द येथे पोलिस असल्याचे भासवून एका व्यक्तीकडून पैसे व सोन्याची अंगठी उकळली होती.
दोन्ही घटनांत महिलांच्या नावाने क्यूआर कोड वापरण्यात आल्याचे दिसून आले त्यामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे‌.

येथील ग्रामस्थांनी मागणी केली आहे की पोलिसांनी या प्रकरणाच्या खोलीत जाऊन तातडीने कारवाई करावी
 आणि भविष्यात घडणाऱ्या घटना टाळाव्यात 
आज डॉक्टरांच्या नावाने लोकांना फसवले जात आहे. ग्रामीण भागातील मेडिकल व्यावसायिक,दुकानदार,सामान्य नागरिक या सर्वांनी सावध राहिले पाहिजे.पोलिसांनी या सायबर भामट्यांचा तातडीने शोध घ्यावा.

सायबर फसवणूक टाळण्यासाठी काही खबरदारी घ्यावी अनोळखी कॉलवर जास्त वेळ बोलू नये त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.क्यूआर कोड किंवा लिंकवरून पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी खात्री करा.शंका आल्यास तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाईनवर व स्थानिक पोलिसांत संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे.

ही घटना फक्त पैशांची नाही,तर आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत करणारी आहे.ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाने सावध राहणेच हाच एकमेव मार्ग आहे असे या घटनेनंतर लोकांना समजू लागले आहे
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!