श्रीरामपूर दिपक कदम राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम लोककलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने "साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे " यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात उत्कृष्ट कुष्ठरुग्ण सेवा केल्याबद्दल जिल्हा कुष्ठरोग पर्वक्षक अहिल्या नगर वैद्य संजय चोखाजी दुशिंग यांना नुकताच श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात समारंभ पुर्वक मान्यवरांच्या उपस्थित वैद्यभूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
कुष्ठरोग पुनर्वसन कार्यक्रमात कुष्ठ रुग्णांना व्यावसायिक प्रशिक्षण,व्यावसायिक मार्गदर्शन,घरकुल योजना,संजय गांधी निराधार योजना,अंत्योदय योजना ,विकृती प्रतिबंध,विना विकृती नवीन कुष्ठरुग्ण शोध, विकृती असलेल्या रुग्णांना पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया करून घेण्यास प्रवृत्त करणे यात श्री.दुशिंग यांचा सक्रिय सहभाग आहे.
कुष्ठरोग पुनर्वसन कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य करून कुष्ठरुग्णांच्या जीवनमान अमुलाग्र बदल घडून आणल्याबद्दल व त्यांचे दैनंदिन जीवन सुखकर केल्याबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत वैद्य.संजय चोखाजी दुशिंग यांना "वैद्यभूषण" हा पुरस्कार दिला गेला असल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
या पुरस्काराबद्दल परिवर्तन फाउंडेशन, विचार जागर मंच, इंडियन रेडक्रॉस सोसायटी ,विद्रोही साहित्य मंच, महाराष्ट्र ख्रिस्ती विकास परिषद ,एकलव्य सेवा संघ, माजी सैनिक संघटना, यांच्या वतीने अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.