केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोणीतील पद्म स्मृती वरील पुतळ्यांचे लवकरच अनावरण

Cityline Media
0
-डॉ पद्मश्री विठ्ठलराव विखे कारखान्याचा नवीन गाळप हंगामाचा शुभारंभ.
-लोणीतील पद्मश्री डॉ.विठ्ठलरराव विखे पा.व पद्मभूषण बाळासाहेब विखे पा.यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण.

-प्रिंप्री निर्मळ येथील प्रदिप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा सोहळ्यास निमंत्रण 

आश्वी संजय गायकवाड केंद्रीय गृह व सहकारमंत्री नामदार अमीत शाह यांची दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी जलसंपदा मंत्री ना.डॉ.राधाकृष्ण विखे पा.व डॉ सुजय विखे यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली.
भेटीत प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याला एन.सी.डी.सी च्या माध्यमातून कर्ज उपलब्ध झाल्याने कारखान्याचे नुतणीकरण पुर्ण झाले असून १५ ऑक्टोबर २०२५ रोजी नवीन गाळप हंगामाचा शुभारंभही करण्यात येणार असल्याचे निमंत्रण दिले 

लोणी बुद्रुक येथील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटीव व आदरणीय पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व पिंप्री निर्मळ, अस्तगाव माथा शिव येथे पं.पू.प्रदिपजी मिश्रा यांचे शिवमहापुराण कथेचे आयोजनही दि.१२ ते १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान करण्यात आले आहे.या तीनही सोळ्यांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यास ना.अमीत शाह यांना निमंत्रित  केले.

या सर्व कार्यक्रमांना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याच्या केलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत,पुढील महीन्यात ना.अमित शाह प्रवरानगर दौ-यावर येणार आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!