विविध कारणांनी चर्चेत आलेल्या ‌महानगरपालिकेच्या ठेक्यास हप्ताभराची मुदतवाढ

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड विविध कारणांनी चर्चेत असलेल्या सफाई ठेक्याला पुन्हा आठवडाभराची मुदतवाढ देण्याचा निर्णय नाशिक महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे १०३ कोटींच्या सफाई ठेक्यात ४ सप्टेंबरपर्यत मक्तेदारांना सहभागी होता येणार आहे.
दरम्यान सफाई ठेक्याची निविदा दोनदा रद्द झाल्यानंतर तिसऱ्यांदा मनपाच्या घनकचरा विभागाने या कामाची निविदा प्रसिद्ध केली आहे.निविदेत सहभागी होण्यासाठीची काल अंतिम मुदत होती. परंतु निविदेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी मक्तेदारांनी केल्याने प्रशासनाने ४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी १७४ कोटींवरील ठेका थेट २३७ कोटींवर गेल्याने यावरुन प्रशासनाकडेच संशयाने पाहिले जात होते. मनपा प्रशासनाने अनपेक्षितपणे या ठेक्याच्या खर्चाला १३४ कोटींना कात्री लावली. त्यामुळे हा ठेका १०३ कोटींवर आला आहे. शहरातील पूर्व व पश्चिम विभागासह रामकुंड परिसरात साफसफाई व स्वच्छतेसाठी आउटसोर्सिंगद्वारे ८७५ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा ठेका दिला जाणार असून तीन वर्ष सफाईची जबाबदारी संबंधित ठेकेदाराकडे असणार आहे.

दरम्यान दोनदा निविदा रद्द झाल्यानंतर पालिकेने तिसऱ्यांदा ई-निविदा प्रसिद्ध केली आली आहे. शहराचा दिवसेंदिवस वाढणा-या विस्तारामुळे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. पंचवीस वर्षापासून नाशिक महानगर पालिकेत नोकर भरती नसल्याने आऊटसोर्सिगच्या माध्यमातून काम करून घेतले जात आहे. त्यातच नव्याने विकसित होत असलेल्या कॉलनी भागांमध्ये नागरी सोयी-सुविधा

पुरविणे मनुष्यबळाअभावी मनपाला शक्य होत नसल्याने महापालिके वर ठेक्याच्या माध्यमातून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्याची वेळ आली आहे.
१ ऑगस्ट २०२० पासून मे. वॉटरग्रेस प्रॉडक्ट्स या ठेकेदार कंपनीला ७०० सफाई कर्मचारी पुरविण्याचा ठेका दिला आहे. या ठेक्याची मुदत ३१ जुलै २०२३ लाच संपुष्टात आली असून तेव्हापासून आतापर्यंत मुदतवाढ देऊन सफाईचे काम केले जात आहे.

सफाई ठेक्याला ४ सप्टेंबर पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. काल निविदेत सहभागी होण्याचा कालावधी संपुष्टात येणार होता. परंतु त्यात आणखी आठवड्याचा कालावधी वाढवण्यात आला असल्याचे मनपा घनकचरा विभागाचे संचालक अजित निकत यांनी सांगितले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!