नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुका विश्व हिंदू रक्षा संघटन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन दिगंबर आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत किशोरदास महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी किशोरदास महाराज यांनी सांगितले की,दिंडोरी येथे विश्व हिंदू रक्षा संघटन संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या अड़अडचणी, विविध योजना, त्याचप्रमाणे रेशन कार्ड,आधारकार्ड आदी कामे करण्यात येणार आहेत. जनतेने काही अडचणी असल्यास कार्यालयाशी संपर्क साधून आपले प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे सांगितले.यावेळी महाराष्ट्र राज्याचे मंडल अध्यक्ष संजय घुमरे,जिल्हाध्यक्ष दीपक मनाल जीवरक्षक सुनील शिदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिंडोरी तालुकाध्यक्ष मित्रानंद जाधव, आध्यक्ष शामराव बोलकर, भाजप नेते चंद्रकांत राजे, भाजप निमंत्रिक सदस्य बिलास देशमुख, प्रभाकर वडजे, भगवान गायकवाड, तुषार घोरपडे, संजय कदम, आकाश बेंडकुळे,
महेश कावळे, बाळासाहेब सोनवणे, ज्ञानेश्वर डेपले, खंडू सितान, शांताराम जाधव, संपत पिंगळ, रोहिदास पाटील, नीलेश शिंदे,कांता देवगुरू,अजित जंगम, विशाल पाचोरकर, सागर शिंदे, तुषार मुरकुटे, प्रशांत गायकवाड, अशोक निकम, ज्ञानेश्वर वडजे, विनोद परदेशी,आबा बोरस्ते, सुखा जाधव,मोनिका गांगुर्डे, ताराबाई काळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
