दिंडोरी येथील गुरुकुल स्कूलमध्ये ‌ गणपती बाप्पाला निरोप

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी येथील गुरुकुल इंटर नॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यंदा गणपती चाप्पाला भरभरून प्रेमाने निरोप दिला.
शाळेत आयोजित करण्यात आलेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीत विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। होते.शाळेच्या आवारात गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापन झालेल्या बाप्पाची मूर्ती दहा दिवसांच्या भक्तीपूर्ण बातावरणाने चैतन्यमय झाली होती.विद्यार्थ्यांनी दररोज गणपतीच्या मूर्तीसमोर आरती, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये पारंपरिक नृत्ये, देशभक्तीपर गीते आणि सामाजिक संदेश देगाऱ्या लघुनाटिका सादर करण्यात आल्या. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्यांची रुजवात झाली आणि सामुदायिक भावनेला प्रोत्साहन मिळाले. सकाळी शाळेच्या प्रांगणातून विसर्जन मिरवणुकीला

सुरूवात झाली. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' च्या जयघोषात विद्यार्थ्यांनी ठेका धरला. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी शाळेचे अध्यक्ष प्रा. अमोल देशमुख, संचालक प्रा. सोमनाथ सोनवणे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले आणि पर्यावरणाची काळजी घेत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.शाळेने यावेळी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून दिले आणि विद्यार्थ्यांनीही शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तीचेच विसर्जन केले, 'मिरवणूक शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. विसर्जनानंतर प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्र यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. गुरुकुल इंटरनेशनल स्कूलने यंदाबा गणेशोत्सव सामाजिक संदेश देत आणि पर्यावरणाची काळजी घेत साजरा केला.त्यामुळे या उत्सवाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!