रिपाइंच्या(गवई)ठाणे जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत केरु वाघमारे यांची निवड

Cityline Media
0
ठाणे विशाल सावंत-ज्येष्ठ पत्रकार व समीक्षक, अभ्यासू, धाडसी चंद्रकांत केरू वाघमारे यांची नुकतीच ठाणे जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असून,रिपाई महाराष्ट्राचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.गौतम पां.गोसावी यांच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांची निवड वरिष्ठांच्या आदेशान्वये जाहीर करण्यात आली आहे.राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.राजेंद्र गवई यांनी निवडलेल्या जिल्हाध्यक्षांचे अभिनंदन व कौतुक केले असून मा. राज्यपाल दिवंगत दादासाहेब गवई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्व निवड झालेले जिल्हाध्यक्ष उपेक्षित व वंचित घटकांसाठी काम करतील अशी अपेक्षा आहे.

ठाणे जिल्ह्यासाठी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार व समीक्षक चंद्रकांत केरू वाघमारे यांची निवड रिपाईचे महाराष्ट्र निवडणूक अधिकारी डॉ. गौतम पां. गोसावी यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे.चंद्रकांत वाघमारे हे आंबेडकरी विचारधारेचे कट्टर समर्थक असून समाज बांधवांवरील अन्यायाविरोधात सतत आक्रमकतेने लढा देत आहेत.

त्यांच्या नियुक्तीचे ठाण्यातील चळवळीला वेग येईल असं म्हटल जात आहे. चंद्रकांत वाघमारे यांचे नियुक्ती बद्दल सर्व राजकीय व सामाजिक स्तरांवर कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!