श्रीरामपूर कृष्णा निकम व्यक्ती व आणि संघटना यांच्या बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करण्याच्या नावाखाली मंजूर केलेले महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे आणि भारतीय संविधानातील मुल्यांचे व मूलभूत हक्काचे उल्लंघन करणारे असल्याने ते ताबडतोब रद्द करावे या मागणीसाठी जन सुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती व महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या वतीने श्रीरामपूर येथील गांधी पुतळा येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
यावेळी काँग्रेस,शिवसेना (उबाठा), भाकप -माले,राष्ट्रवादी (श.पा.),आम आदमी पार्टी, समजवादी पक्ष,भाकप, सर्वउद्योग कामगार संघटना, श्रमिक महासंघ या सह विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यांच्यासह मोठ्या संख्येने लोक आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पोलीस प्रशासनामार्फत शासनास निवेदन सादर करण्यात आले.