नाशिक दिनकर। गायकवाड नाशिक विकास भवनाच्या अंतर्गत येणाऱ्या कळवण तालुक्यातील व कळवण आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत चणकापूर आश्रमशाळेत शिकणाऱ्या रोहित विलास बागुल या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी अभोणा पोलीस ठाण्यात येथे मुख्याध्यापक व अधीक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढे दोघांवर काय कारवाई होणार? याकडे तालुक्यासहित पालकांचे व आदिवासी संघटनांचे लक्ष लागून आहे.
मृत रोहित बागुलचे बडील विलास मोतीराम बागुल रा. सरलेदिगर, ता. कळवण यांच्या फिर्यादीवरून शासकीय आश्रम शाळा चणकापूर, ता.कळवण येथे मुख्याध्यापक बालाजी नामदेवराव भुजबळ व अधीक्षक संजय नामदेव नांदणे हे चणकापूर आश्रमशाळेवर कार्यरत आहे. मुलगा रोहित बिलास बागुल (१२) हा इयत्ता तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत होता व वसतिगृहात राहत होता. आरोपी मुख्याध्यापक बालाजी नामदेवराव
भुजबळ व अधीक्षक संजय नामदेव नांदणे यांचे शासकीय कर्तव्य असताना त्यांनी फिर्यादी बिलास बागुल यांचा मुलगा मागील ३-४ दिवसांपासून आजारी असल्याचे माहीती असताना दि. ७ सप्टेंबरला विलास बागुल यांच्याच गावातील
गुलाब महाले त्यांच्या मुलाला पाहण्यासाठी आश्रमशाळेवर गेलेला असता अधीक्षक ब मुख्याध्यापक यांनी फिर्यादी बागुल यांना काही एक न कळवता त्यांचा मुलगा रोहित यास परस्पर गुलाब महाले यांच्या ताब्यात देवून घरी पाठवून दिले. रोहित वेळेत कोणताही वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. फिर्यादी बागुल यांच्या मुलाचा मृत्यू हा आरोपींच्या हलगर्जीपणामुळेच झाला आहे, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे करीत आहेत.
