कनाशी आश्रम शाळेतील निकृष्ट जेवणाचा सडलेला भाजीपाला मंत्र्यांसमोर फेकला

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड कळवण तालुक्यातील कनाशी शासकीय आश्रमशाळेत दोन दिवसांपूर्वी साधारण १५१ विद्यार्थी अचानक आजारी पडल्या होत्या.ही घटना समोर आल्यानंतर स्थानिक पातळीवर संतापाची लाट उसळली होती. या सर्व प्रकाराची पाहणी करण्यासाठी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांचा नियोजित दौरा कनाशी येथे झाला.मात्र, विद्याथ्यांची तब्येत विचारण्यासाठी आलेल्या मंत्र्यांना आदिवासी बांधवांनी आणि पालकांनी चांगलेच घेरले.
            छायाचित्र-अजित अशोक ब्राह्मणे 
आदिवासी विकासमंत्री अशोक उईके कनाशी आश्रमशाळेत पोहोचताच पालकांनी विद्यार्थ्यांसाठी आलेल्या भाजीपाल्याची पाहणी केली. त्यात कांदा, बटाटा,वांगी, कोबी, शिमला मिरची, टोमॅटो,भोपळा यांसह इतर भाज्या सडलेल्या अवस्थेत दिसून आल्या. अनेक

भाजीपाला कुजून त्यात अळ्या पडलेले असल्याचेही उघड झाले. ही स्थिती पाहून पालकांचा संताप अनावर झाला.पालकांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, असा भाजीपाला जनावरेसुद्धा खाणार नाही आणि तोच आमच्या मुलांना शिजवून दिला जातो. त्यामुळेच शेकडो विद्यार्थी आजारी पडत आहेत. आम्ही मुलांना प्रशासनाच्या भरोशाबर शाळेत पाठवतो, पण इथं त्यांच्या आरोग्याशी उघडपणे खेळ चालू असल्याचे सांगितले. या संतापाचा परमोच्च बिंदू म्हणजे आदिवासी बांधव व आदिवासी संघटनानी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या गाडीसमोरच सडलेला भाजीपाला टाकून निषेध नोंदवला. यावेळी पालकांनी जोरदार घोषणाबाजी करत आदिवासी प्रकल्प प्रशासनाच्या बेपर्वाईचा सुद्धा निषेध व्यक्त केला. पालकांनी आणि आदिवासी संघटनांनी सर्व तक्रारी मंत्री उईके

यांच्यासमोर मांडल्या.मात्र, या गंभीर विषयावर त्यांनी कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे पालकांमध्ये नाराजी पसरली.

आदिवासी विद्यार्थीनीच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर आदिवासी विकास मंत्री काही बोलत नाहीत, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे पालकांनी स्पष्ट केले. या घटनेनंतर आदिवासी विकास विभागाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले

आहे. आश्रमशाळांमध्ये राहणाऱ्या विद्याथ्यांना नीट अन्न-पाणी, आरोग्य सुविधा, तसेच सुरक्षित बाताबरण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु सडलेला व अळ्यानी भरलेला भाजीपाला पुरबला जात असल्याने प्रशासनाच्या कारभारातील ढिसाळपणा उघडकीस आला आहे

या संपूर्ण प्रकरणानंतर पालक, ग्रामस्थ आणि आदिवासी संघटनांनी ठाम भूमिका घेत पुरवठादार तसेच त्याच्या बरोबर संगनमत असलेल्या दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. मंत्री उईके यांच्या दौन्यानंतरही ठोस निर्णय न झाल्याने स्थानिकांमध्ये असंतोष पसरला आहे. आता या घटनेनंतर प्रशासन कोणती कारवाई करते आणि विद्याथ्यांच्या हितासाठी कोणती ठोस पावले उचलली जातात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!