श्रीरामपूर दिपक कदम ज्यानं एका जीवनास वाचविले त्याने समस्त सृष्टीचा जीव वाचविले व ज्यानं एका जीवाची रक्षा केली त्यानं संपूर्ण मानवजातीची रक्षा केली " पवित्र कुरआन तील या पवित्र आयती च्या शिकवणी नुसार सप्टेंबर श्रीरामपूर येथील डॉ सलीम शेख यांच्या बैतुशशिफा दवाखान्यात " विद्रोही संस्कृतक चळवळ महाराष्ट्र व जमिल काकर मेडिकल फौंडेशन, बैतुशशिफा मेडिकल फौंडेशन व अहिल्यानगर येथील साईसेवा ब्लड बँक " यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर आयोजन केले होतें.
रक्तदान शिबिरामध्ये तीन महिलांनीं,तीन हिंदू बांधूनी व ५७ मुस्लिम बांधव मिळून ६३ रक्तदात्यांनी मानवतेसाठी स्वखुशीने पवित्र दान रक्त दान केले यामध्ये काही रकदात्यांची ३०- ४० ५० वी ६० वी वेळ होती,अशपाक बाबुलाल शेख यांची ५८ वी वेळ तर मोहसीन बाऊन्सर यांची तर ७० वी वेळ ऐकून तेथील नवीन रक्त वृक्षदान करणाऱ्याना फार कुतूहल वाटलं व त्या नंन्तर अनेक नव नवीन मुलांनी स्वच्छेने रक्तदान केले.
अशपाक बाबुलाल शेख व काही रकदात्यांचा सन्मान भेट देण्यासाठी आलेल्या आमदार हेमंत ओगले, मा.उपनगराक्ष करण ससाणे,श्रीरामपूर शहराच्या लोकनियुक्त नगराक्षा अनुराधा आदिक, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे श्रीरामपूर अध्यक्ष लकी सेठी, साई बाबा संस्थाचे सदस्य सचिन गुजर,नेते सिद्धार्थ मुरकुटे,ज्ञानेश्वर मुरकुटे, विद्रोही सांस्कृतिक चळवळ चे राज्य सचिव डॉ जालिंदर घिगे काकर समाज चे जावेद काकर, दिलीप नगारे,नाना पाटील, हाजी मुझफ्फर शेख, हाजी मुख्तर शहा,राहुरी हुन आलेले विद्रोहीचे महेश साळवे, यांच्या हस्ते प्रेषित मुहम्मद स्व यांच्या जीवन चारित्र वरील पुस्तकं देवून सन्मान केला. रक्तदान शिबिराला रक्तदात्यांना शुभेच्छा व भेट देण्यासाठी विशेष करून शहरातील सिख धर्म गुरु जी ग्यानी अलोक मस्कीन, महाराष्ट्र राज्य काझी समाज अध्यक्ष व श्रीरामपूर शहर काझी मौलाना अकबर अली सय्यद,उमर फारूक मस्जिदचे हाफिज सहाब,श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे चे प्रमुख पोलिस निरीक्षक नितीन देशमुख व त्यांचे सहकारी,भारतात विविध सामाजिक संघटनेत व कम्युनिस्ट चळवळीत काम करणारे कॉम्रेड जीवन सुरुडे,व सामाजिक कार्यकर्ते मुदस्सर मुस्ताक पटेल, वंचित बहुजन आघाडीचे सुनील वाघमारे,भा ज पाचे रवी पंडित,भा ज पाचे साजिद शेख, राष्ट्रवादी शरद पवारचे ॲड राजेश बोर्डे,संविधान बचावचे अहमद जहागीरदार,याकूब कुरेशी सहाब, भाजपाचे हाजी आरिफ बागवान,समाजवादी पार्टीचे जोएफ जमादार, काँग्रेसचे रियाज पठाण,जाफर शाह,बहुजन पक्षाचे जाकीर शहा, इब्राहिम पोलीस, रिश्ते नातेचे मुस्ताक शेख वेस्टन खानवळ चे अकबर पठाण , शिवसेना वाहतूक शाखेचे यासिन सय्यद, लेबर अधिकारी लतिफ पटेल विशेषता: बरखेडी पाचोरा येथून खास शिबिरासाठी आलेले जमिल काकर, काँग्रेस सेवा दलाचे मास्टर सरोवर सय्यद, शौकत शेख,सलीम टूर्नर, सलीम जहागीरदार, तौफिक शेख, अहमद शहा,अमीन शहा, नूरा, फिरोज पोपटीया, इत्यादी, अनेक उत्साही युवक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व असे विविधतेत ऐकतेला मानणारे सर्व विविध स्थरातील सामाजिक,राजकीय, इंजिनीरिंग, वैद्यकिय, वकील, शिक्षण क्षेत्रातील, मंडीळीनीं आवर्जून भेटी दिल्या.यामध्ये प्रेषित मुहम्मद स्व.च्या जीवन चरित्र वरील पुस्तकं मानवता फॉउंडेशन चे अध्यक्ष व समाजसेवक सलीम खान पठाण यांनी २५ पुस्तकं व डॉ सलीम यांनी ५० पुस्तकं,हार पुष्पगुच्छ फुलं ऐवजी पुस्तकं भेट देण्यात आली
या शिबिरास सहकार्य करणारे जमील काकर मेडिकल फॉउंडेशनचे इकबाल इस्माईल काकर, सचिव जुनेद जमिल काकर,ज्यांनी दिवस भर मेहनत करून काकर समातील जास्तीत जास्त रक्तदान कसे होईल असे विशेष कार्य जावेद काकर यांनी केले, विद्रोही संस्कृतिक चळवळीचे अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष अशोक दिवे,विद्रोही राज्य कार्यकारणी सदस्य शाहीर भीमराव कदम, विद्रोही संघटक ॲड.अमोल सोनवणे,संतोष त्रिभुवन, बौद्ध महासभा व विद्रोहीचे राजेंद्र हिवाळे , बँक व्यवस्थापक अकबर शेख, तन्वीर शेख, खालिद मोमीन, खोकरचे अभियंताराजु पठाण, मालुंजेचे राजु सिकंदर शेख, बिलाल काकर,दययान काकर, दानीयल काकर, तसेंच डॉ सलीम शेख बैतुशशिफा मेडिकल फौंडेशनचे डॉ सलीम शेख व अहिल्यानगर येथील साईसेवा ब्लड बँक चे संचालक अजित जगताप व त्यांची संपूर्ण स्टाफ त्यामध्ये तीन महिला परिचारिका व दोन पुरुष ब्रदर यांनी विशेष मेहनत घेऊन ६३ रकदात्यांचे रक्तदान अगदी उत्साही वातावरणात यशस्वी केले.
