दाढ खुर्द किशोर वाघमारे संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील खळी येथील भोलेनाथ दूध सहकारी उत्पादक संस्थेच्या वतीने येथील दूध उत्पादक सभासदाला पाच किलो मोफत साखर तसेच चार रुपये रिबेट देऊन सभासदची दिवाळी गोड करणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब लहानू नागरे यांनी संस्थेच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नुकतीच केली आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेला यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी संगमनेर तालुका दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर ज्येष्ठ नेते सुरेश नागरे श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष किशोर वाघमारे संस्थेचे उपाध्यक्ष सुनील दामू लबडे संस्थेचे मा अध्यक्ष साहेबराव मुकिंदा तांबे मा.उपाध्यक्ष हौशीराम बाळू लबडे संस्थेचे विद्यमान
संचालक सोपान यशवंत आंधळे विजय अंतोन वाघमारे सह्याद्री विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक चंद्रभान तांबे सोपान उगलमुगले आदी प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित होते यावेळी संस्थेचे सचिव छबु धात्रक यांनी सभेपुढे येणाऱ्या विषयाचे वाचन केले.
सर्व विषयाला मंजुरी देण्यात आली प्रसंगी ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करत कर्मचारी पगार वाढ बोनस गणवेश सभासदांना मोफत साखर तसेच जास्त दूध टाकणाऱ्या दूध उत्पादक सभासदांचे संस्थेच्या वतीने क्रमांक एक दोन तीन क्रमांकाचे जास्त रिपीट घेणाऱ्या व संस्थेला जास्त दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादक सभासदाचे सत्कार करण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने मोठ्या भाऊ नागरे सुनील नामदेव नागरे चंद्रभान बाळू लबडे या तीनही दूध उत्पादक पुरवठा करणाऱ्या सभासदांचा शाल श्रीफळ व त्यांच्या घरातील लक्ष्मी गृहिणीसाठी पैठणी साडी आदी देऊन अध्यक्ष भाऊसाहेब नागरे उपाध्यक्ष सुनील लबडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी राजहंस दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर यांनी सभासदांना मार्गदर्शन करताना सहकार टिकवणे काळाची गरज असून सहकारी संस्थेला दूध उत्पादकांनी जास्तीत जास्त दूध घातल्यास दिवाळी रिपीट व सभासद विमा व अन्य शासनाच्या योजना या प्रामुख्याने दूध उत्पादक सभासदांना मिळणार आहे.
लोकांनी शाश्वत दूध संस्था म्हणून या संस्थेला दूध पुरवठा करावा व संस्थेच्या वतीने लवकरच एक लाख रुपये सभासद विमा झालेल्या दूध उत्पादक सभासदांना देणार असल्याची घोषणा राजेंद्र चकोर यांनी केली तसेच संस्थेचा बर कुलर हे दोन हजार वरून क्षमता
३००० लिटर दैनंदिन केली असून कमी दरामध्ये राजहंस मेडिकल मार्फत उत्पादकांसाठी मेडिकल येथे दिवाळीपर्यंत सुरू करणाऱ्या असल्याची घोषणा राजेंद्र चकोर यांनी केली आहे तसेच आणीबाणी मध्ये गाई मरण पावल्यास राजहंस संघाच्या मार्फत दूध उत्पादक सभासदाला भरपाई म्हणून २० ते ३० हजार रुपयांची मदत केली जाणार असल्याचे बोलले आहे.
तसेच संस्थेच्या खर्चामध्ये कपात व्हावी म्हणून वीज मंडळाला विज बिल मध्ये अनेक पैसे खर्च होतात त्यामुळे बचत व्हावी म्हणून दूध संस्थेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा राजेंद्र चकोर यांनी केली आहे यावेळी सभासद मोठ्या संख्येने वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित होते.
या सभेसाठी खळी सेवा सोसायटीचे अध्यक्ष सूर्यभान सानप उपाध्यक्ष हौशीराम नागरे विद्यमान संचालक सुनील नागरे दिलीप तांबे रत्नाकर वाघमारे सोमनाथ नागरे शिवाजी वाघमारे आधी प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
