पावसाच्या पाण्याचा तडाखा; ग्रामस्थ भीतीच्या वातावरण
आश्वी संजय गायकवाड राहुरी तालुक्यातील निंभेरे येथे निळवंडे धरणाचा उजवा कालवा पावसाच्या प्रचंड पाण्यामुळे फुटला.शनिवारी सकाळी झालेल्या या घटनेने परिसरात मोठी धास्ती पसरली पाट परिसरातील वस्त्या आणि गावातील नागरिक चिंताग्रस्त झाले आहे.
-पाण्याचा प्रवाह वडनेरकडे वळला
पाटाची भिंत फुटल्याने आलेले पाणी वडनेरकडे वळले.सुदैवाने निंभेरे येथील शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे नुकसान टळले असले तरी भितीचे संकट कायम आहे मात्र त्यात कुठल्याही प्रकारची मानवी हानी झाली नाही. या प्रकाराने ग्रामस्थ हादरले असून भविष्यातील धोका लक्षात घेता तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
-पालकमंत्र्यांकडे पाट दुरुस्तीची मागणी मागणी
ढगफुटी सदृश्य पर्जन्यवृष्टीमुळे या प्रसंगी सरपंच शांताराम सिनारे, मा.सभापती भीमराज हरदे,तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू सिनारे, कामगार पोलीस पाटील बाळकृष्ण हारदे,सचिव माधव हारदे,शहाजी हारदे, राजेंद्र हारदे, चांगदेव हारदे, गोरख साबळे, तसेच अभियंता चोपडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामस्थांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा.व आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे पाटाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.
-भविष्यात भिती कायम
कालवा फुटल्याची घटना घडताच ग्रामस्थांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे.सतत कोसळणाऱ्या पावसामुळे धरणातील पाण्याचा दाब वाढत असून,भविष्यात आणखी गंभीर घटना घडू नयेत यासाठी संबंधित विभागाने वेळीच उपाययोजना करावी,अशी जोरदार मागणी होत आहे.
