हिवरगाव पावसा येथील ज्येष्ठ संबळ वादक कालवश

Cityline Media
0
लोककलावंत बाजीराव तुकाराम भालेराव यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन 

संगमनेर नितीनचंद्र भालेराव कला संस्कृतिक क्षेत्रात आपल्या कौशल्याने लोकवाद्य वाजवत असलेले संबळ वादन करणारे संगमनेर तालुक्यातील लोककलावंत
बाजीराव तुकाराम भालेराव यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी नुकतेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
लोककलावंत म्हणून बाजीराव तुकाराम भालेराव यांनी तब्बल पन्नास वर्षे कार्य केले.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव,तमाशा कलावंत रघुवीर खेडकर,राजहंस दूध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे,भाजपा मा. तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,

सरपंच सुभाष गडाख,गणेश दवंगे, कलावंत विलास कुमार( राज) गायकवाड देवठाणकर सह सौ.शेषकन्या पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ केंद्र संगमनेर,भारत नागपूरकर,सविता पुणेकर,सुनील औरंगाबादकर,यांच्या सह लोककला क्षेत्रातील अनेक कलाकारांनी तसेच मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

आपल्या संबळ आणि सनई वादनाच्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या बाजीराव तुकाराम भालेराव यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले.बाजीराव तुकाराम भालेराव यांनी अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने शून्यातून आपले विश्व निर्माण केले.

हिवरगाव पावसा हे गाव कलावंतांची भूमी म्हणून ओळखली जाते.बाजीराव भालेराव यांना मुळातच संगीत क्षेत्राची आवड होती.आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर व कलाभूषण लहुजी भालेराव यांच्या समृध्द कलेचा वारसा  हिवरगाव पावसा कला नागरीत  टिकविण्याचे कार्य जुन्या पिढीतील कलावंतांनी केले आहे.

त्यापैकी बाजीराव भालेराव यांनी संबळ वादक म्हणून नावलौकिक मिळवला.संगीत हाच ध्यास आणि संगीत हाच श्वास हा मंत्र त्यांनी अखेरपर्यंत जपला.
लोककलावंत बाजीराव तुकाराम भालेराव त्यांच्या पश्चात पत्नी  जमुनाबाई,मुले सचिन,महेंद्र, महेश,मुली मनीषा,शारदा व सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांच्या निधनाने हिवरगाव पावसा पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचा जलदन विधी हिवरगाव पावसा हनुमान मंदिरासमोरील सामाजिक सभागृह येथे मंगळवार दि.३० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!