शिवसेना शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख सुरेखा गव्हाणे यांचे विविध उपक्रम

Cityline Media
0

झरेकाठी सोमनाथ डोळे भाद्रपद गणेश चतुर्थी निमित्ताने शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख आणि नवी मुंबईच्या बेलापूर विधानसभा सभा प्रमुख सौ.सुरेखा भगवान गव्हाणे यांनी नुकतेच मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिर येथे भाद्रपद गणेश चतुर्थी निमित्ताने २१ महिलांचे सामुहिक गणपती अथर्वशीर्ष पठणतात महिलांचा सहभाग नोंदविला.
दरवर्षी प्रमाणे असंख्य महिला या अथर्वशीर्ष कार्यक्रमात तन्मयतेने सहभागी होतात.सौ.गव्हाणे या दरवर्षी सिद्धिविनायक मध्ये हा उपक्रम दरवर्षी असतो त्या उपक्रमांमध्ये सहभागी घेत सगळ्या महिलांना घेऊन जातात.

अनेक महिलांना त्या सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी घेऊन जातात तसेच जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा महाविद्यालय इतर कॉलेजेस् मध्ये भगवतगीता पाठांतर स्पर्धा घेतात व भगवतगीतेतील श्लोकाचा अर्थ देखील विद्यार्थ्यांना समजून सांगतात,प्रत्येकाने ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभावी,घराघरात ज्ञानेश्वरीचे वाचन झाले ‌पाहिजे असा सौ.गव्हाणे यांचा होरा आहे.

सर्व जणांनी ज्ञानेश्वरी वाचावी म्हणून त्या सदैव तत्पर असतात अनेक शाळा,सोसायटी मध्ये त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.याच कामामुळे त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवी मुंबई भुषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!