नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागात अवैध धंद्यांचे जाळे वाढल्याने तसेच अवैध मद्यविक्री वाढल्याने त्यामुळे तरुण पिढीला व्यसनाधीन होण्यास हातभार लागत आहे, यातून सुटका व्हावी म्हणून महिलांनी एल्गार करण्याचा पवित्रा घेतला आहे.
शासनाने परवाना नसलेल्या व प्रतिबंध असलेल्या कुठलाही व्यवसाय अथवा कोणतेही उत्पादन विक्री करण्यास मनाई घातलेली असताना देखील हे व्यवसाय वणी,चंडीकापूर, मांदाणे,अहिवंतवाडी,जिरवाडे, अंबानेर,सागपाडा,फोफशी,काजीमाळे,करंजखेड,पांडाणे,
चौसाळे,एकलहरे,खोरीपाडा, पिंगळवाडी, पिंप्री अंचला, हस्ते दुमाला, पुणेगाव,कोल्हेरे, टाक्याचापाडा, कोशिंबे या परिसरात रोजरोसपणे सुरू आहेत. तसेच त्याचबरोबर त्यांच्यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.चहा विक्री आणि अल्पोहार दारु विक्रीच्या स्टॉलवर प्रतिबंधित उत्पादनासह मद्यविक्रीची विक्री सुरू आहे. त्यामुळे शेतात मजुरी करून आपला उदरनिर्वाह सांभाळणाऱ्या महिलांना आणि क्योवृद्धांना रस्त्याच्या कडेला जागोजागी विक्री होत असलेल्या मद्यविक्रीच्या ठिकाणांचा मनस्ताप होत आहे.
आतापर्यंत झालेल्या रोड अपघातात मद्यसेवन करून दुचाकी चालवण्या-यांची संख्या जास्त प्रमाणात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामध्ये अनेक कुटुंबप्रमुख असलेले तरुण मृत्युमुखी पडून कुटुंब उघड्यावर पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
या अवैध व्यवसायांचा कायमचा बंदोबस्त व्हावा म्हणून आतापर्यंत परिसरातील बन्याच गावांच्या महिलावर्गनि, चचतगटाच्या महिलांनी त्याचबरोबर दारुबंदी महिला संघटनांनी अवैध दारू विक्रेत्यांवर मोर्चे काढून हाती लागलेला मद्यसाठा हस्तगत करून संबंधित विभागाला कळवून अशाप्रकारचे धंदे उधळून लावण्याचे प्रयत्न केले. पण याच व्यावसायिकांचे प्रत्येक गावात जवळचे दोन-चार हितचिंतक असल्याने ठिकाण बदलून त्या व्यवसायाचे बस्तान बसवण्यासाठी मदत करताता, उघड्यावरील दारू विक्रेत्यांवर संबंधित विभागाने वरवर कारवाई न करता समूळ उच्चाटन करून पुरवठा करणान्य लाईन कायमस्वरूपी थांचवण्याची परिसरातून मागणी केली जात आहे.
