अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अहिल्यानगर प्रतिनिधी नेवासा तालुक्यातील मुकींदपुर येथील बादल उर्फ सुरेंद्रसिंग कैलास परदेशी, (वय३१) रा. मुकींदपुर,ता नेवासा, जि.अहिल्यानगर याने नेवासा पोलीस ठाणे हद्दीत गैर कायदयाची मंडळी जमवुन -शस्त्रासह गंभीर दुखापत करणे,सरकारी नोकरास त्याचे कायदेशीर कामापासुन परावृत्त करुन बनावट नंबर प्लेटच्या वाहनातुन गौण खनिजाची चोरी करणे,मानवी शरीरास अपायकारक अशी गावठी हातभट्टीची दारु तयार विक्री करणे,अनुसुचित जाती जमातीच्या व्यक्तीस गंभीर दुखापत करुन नुकसान करणे,
सार्वजनिक ठिकाणी किंवा नोकरास त्याचे कामापासुन परावृत्त करणे असे गंभीर स्वरुपाचे मानवी शरीराविरुध्दचे गुन्हे करुन तेथील राहणारे सर्व त्या लोकांवर दहशत निर्माण केलेली होती.त्यामुळे भिंगार पोलीस ठाणे तसेच आजुबाजुच्या परिसरात सार्वजनिक सुव्यवस्था बाधीत झाली होती.
सराईत गुन्हेगार बादल उर्फ सुरेंद्रसिंग कैलास परदेशी याचे समाजविघातक कृत्यांना आळा यासाठी प्रचलित कायद्यान्वये करण्यात आलेल्या प्रतिबंधक व हद्दपारीच्या कारवाया अपुऱ्या व कुचकामी ठरत होत्या.गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस निरीक्षक,धनंजय जाधव, नेवासा पोलीस ठाणे एम.पी.डी.ए.यान्वये प्रस्ताव तयार करुन अमोल भारती,उप विभागीय पोलीस अधिकारी,शेवगाव विभाग यांचे वैभव में,अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्फत पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे,यांना केला.
सदर प्रस्तावाची अधिक्षक सोमनाथ घार्गे, यांनी बारकाईने पडताळणी करुन सदरचा हा शिफारस अहवालासह जिल्हादंडाधिकारी,अहिल्यानगर यांना सादर केला होता.
सराईत गुन्हेगार बादल उर्फ सुरेंद्रसिंग कैलास परदेशी याचे विरुध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
पो. ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर
नेवासा ३०१/२०१७ भा.द.वि.क. १४३,१४७,१४८, १४९,३२३,३२६,५०४,५०६ सह आर्म ॲक्ट ४/२५ नेवासा ०८/२०१९
भा.द.वि.क.३५३,३३२,३७९,४२०,४६७,५११,३४ सह गौण खनीज कायदा कलम ३/१५ नेवासा २१९/२०२० भा.द.वि.क. ३२८,१८८,२६९,२७० महाराष्ट्र दारुबंदी अधि. कलम ६५ (ई), ६५ (फ),८३नेवासा ५३१/२०२० भा.द.वि.क. ३५३,३३२,२९४, ५०४,५०६ नेवासा
७१७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८९(२),१९१(२),१९१(३),१९०,११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२ नेवासा ७२१/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८ (१)१८९
(२), १९१(२),१९१(३),११९ (१), ३२४
(४),३२४(५),११५ (२),३५१ (२), ३५२ सह अनुसुचित जाती जमाती अधि. ३(१)(r) ३(१)(s), ३(२)(v-a)
नेवासा ५४८/२०२५ भा.न्या.सं.१३२,३५१(२), २२१
त्याचप्रमाणे अहिल्यानगर शहरातील सारसनगर येथील राहणारा ऋषीकेश उर्फ भावड्या अशोक बडे, वय २६ सारसनगर, ता.जि.अहिल्यानगर याने भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत व परिसरात त्याचे साथीदारांसह घातक शस्त्र दरोडा टाकणे,
खंडणी मागे वाहनावर पेट्रोल टाकुन पेटवून नुकसान करणे,गैर कायद्याची मंडळी जमवुन शस्त्रासह खुनाचा प्रयत्न करणे,घातक शस्त्रासह गंभीर दुखापत करणे असे गंभीर स्वरुपाचे शरीराविरुध्दचे गुन्हे तेथील राहणारे सर्व सामान्य लोकांवर दहशत निर्माण केलेली होती.
त्यामुळे भिंगार पोलीस ठाणे तसेच आजुबाजुच्या परिसरात सार्वजनिक सुव्यवस्था बाधित झाली होती.सराईत गुन्हेगार ऋषीकेश उर्फ भावड्या अशोक वडे याचे समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रचलीत कायद्याव्यये आलेल्या प्रतिबंधक व हद्दपारीच्या कारवाया अपुऱ्या व कुचकामी ठरत होत्या.
त्याचे गुन्हेगारी कृत्यांना प्रतिवंध यासाठी ठी सहा.पोलीस निरीक्षक,जगदिश मुलगीर,भिंगार पोलीस ठाणे यांनी एम.पी.डी.ए.कायदयान्वये प्रस्ताव तयार अमोल भारती,उप विभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर विभाग यांचे च वैशव कलुवर्गे, अपर पोलीस अहिल्यानगर यांच्या मार्फत सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर यांना सादर केला.
सदर प्रस्तावाची सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर यांनी पारकाईने पडताळणी करुन सदरचा हा शिफारस अहवालासह जिल्हादंडाधिकारी, अहिल्याबगर यांना सादर केला होता.
सराईत गुन्हेगार ऋषीकेश उर्फ भावड्या अशोक बड़े याचे विरुध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
गु.र.नं. व कलम भिंगार कॅम्प ४१०/२०२१ भादविक ४२७,४३५भिंगार कॅम्प ४६७/२०२१ भादविक ३०७,३२७,३२४,३२३,४२७,३८४,५०४,५०६ भिंगार कॅम्प ५३१/२०२२ भादविक ३८४,३२७,३२३,५०४,५०६,३४ सह आर्म ॲक्ट कलम ४/२५ कोतवाली
१३१७/२०२३ भा.द.वि.क३९५,५०६,४२७
भिंगार कॅम्प ४९६/२०२४ भा.द.वि.क. ३९५ सह आर्म अॅक्ट कलम ४/२५ सह महा. पो. का.क. १४२भिंगार कॅम्प २५४/२०२५ भा. न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ११८(१) ,११५ (२), १२५,१८९, १९१(२), १९१(३), १९०,३२४(४) नमुद प्रस्तावांची व सोबतच्या कागदपत्रांची डॉ.पंकज आशिया,जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांनी तपासणी करुन अहिल्यानगर जिल्हयातील सार्वजनिक सुव्यवस्था अबादित राहावी याकरीता सराईत गुन्हेगार बादल सुरेंद्रसिंग उर्फ कैलास परदेशी, वय ३१ वर्षे, रा. मुकींदपुर,ता.नेवासा, जि.अहिल्यानगर व ऋषीकेश उर्फ भावड्या अशोक बडे, वर्षे, रा.सारसबगर, ता.जि. अहिल्यानगर यांना स्थानबध्द करणे बाबतचे आदेश काढले असुन त्यास ताब्यात घेवुन मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबध्द केले आहे.
सदर कारवाई. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी, पोलीस उप निरीक्षक दिपक मेढे, राजेंद्र वाघ, स.फौ. रविंद्र पांडे,पोहेकॉ सुरेश माळी, ऋदय सुयोग सुपेकर,राहुल व्दारके, लक्ष्मण खोकले,फुरकान शेख,पोना रिर्चड गायकवाड,सोमनाथ झांबरे, हेव नागरगोजे, पोकों प्रशांत राठोड, विशाल तनपुरे व मपोकों सोनल भागवत यांनी केली आहे.
अहिल्यानगर जिल्हयातील सराईत गुन्हेगार,वाळु तस्कर तसेच संघटीतपणे गुन्हे करणा-या टोळीच्या लीवर लक्ष ठेवण्यात येत असुन त्यांचेवर प्रचलित कायदयान्वये कठोर कारवाई करण्याचे संकेत डॉ.पकंज आशिया, जिल्हादंडाधिकारी,अहिल्यानगर व सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी आहेत.
