राहुरी पोलिसांकडून लैंगिक अत्याचार गुन्हा तपासा दरम्यान खुनाचा उलगडा

Cityline Media
0
 -लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या क्रूरतेचा कळस
  
 -लैंगिक अत्याचार गुन्ह्यात तसेच खुनाच्या गुन्हयातही आरोपी वाढण्याची शक्यता
  
अहिल्यानगर प्रतिनिधी येथील स्नेहालय संस्थेचे स्वयंसेवक पुजा दहातोंडे यांनी नुकतेच  सुमारास राहुरी पोलीस ठाणे येथे दिलेल्या माहितीवरून चार अल्पवयीन पीडित मुलींची सुटका करत लैंगिक अत्याचार करणारे दांपत्य  गजाआड करत असतानाच 
१) बजरंग कारभारी साळुंखे वय (३९ वर्ष)२ ) शितल बजरंग साळुंखे (वय ४० वर्ष दोघे राहुरी तालुक्यातील दवणगाव यांना अटक करण्यात आली होती.
तर सदर दाखल गुन्ह्यातील आरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर (वय ३२32 वर्ष राहणार राहता यास अटक करणे बाकी होते.अटक आरोपीच्या मदतीने पाहिजे आरोपीस अटक करण्याकरिता व इतर तपासा करिता अटक दांपत्यास न्यायालयापुढे हजर करून त्यांची दिनांक पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली होती.

पोलीस तपासादरम्यान सदर दांपत्याने अल्पवयीन मुलीं पैकी एका अल्पवयीन मुलीचे(ती १४ वर्षाची असताना पन्नास वर्षीय व्यक्तीसोबत पाच वर्षा पूर्वी लग्न लावून एक लाख रुपये घेतल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. व नंतर परत तीन महिन्याने तिला आपल्याकडे राहण्यासाठी आणले.

तर दुसऱ्या मुलीचे (१६ वर्ष वय) अल्पवयीन असताना लग्न लावून देण्यासाठी तीन लाख रुपये घेतलेले असल्याचे तपासात समजलेले आहे. याबाबत अधिक तपास सुरू असताना पोलीस कस्टडी रिमांड मध्ये  अटक आरोपींकडे  पाहिजे आरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर (वय ३२) राहणार राहता याच्याबाबत विचारणा केली असता सुरुवातीला त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.
परंतु  अटक आरोपींकडे कसून चौकशी केली असता बजरंग कारभारी साळुंखे (वय ३९ वर्ष) राहणार दवणगाव याने गुन्ह्यात पाहिजे आरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर याच्यासोबत मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याच्या कारणाने  मार्च २०२५ मध्ये एके दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्याचे राहते घरी गळा दाबून खून करून त्याचा मृतदेह ज्या खोलीत त्याचा खून केला तेथेच रात्री दहापर्यंत ठेवून,रात्री नऊ ते दहा च्या दरम्यान राहते घरामागे खड्डा खोदून मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पत्नीच्या साह्याने पुरून लपवून ठेवल्याचे सांगितल्याने भारतीय न्याय संहिता कलम१९६ अन्वये सदर माहितीची खातर जमा करणे कामी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तहसीलदार  श्रीमती संध्या दळवी यांना पाचरण करून दोन पंचा समक्ष अटक आरोपीने दिलेल्या निवेदनाप्रमाणे खात्री केली असता दुपारी आरोपीने दाखवलेल्या ठिकाणी देवळाली नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने माती उकरून पाहिले असता मृतदेह मिळून आला.

मृत आरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर हा राहता येथील राहणारा असून त्याचे आई-वडील मयत झालेले असल्याने तो अटक दांपत्याकडेच राहत होता.  त्यामुळे त्याची कुठेही मिसिंग किंवा हरवल्याबाबतची तक्रार देण्यात आलेली नसल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.

तरी मृतदेहाची दवणगाव येथील स्थानिकांच्या मदतीने  तो निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर याचाच असल्याची खात्री करण्यात आली आहे. 
सदर मृतदेह प्रयोग शाळा तपासणी कामी प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी  तहा खान व प्रसाद मासाळ यांच्यामार्फत शवविच्छेदन करून अंत्यविधी करिता त्याचे नातेवाईक नसल्याने दवणगाव ग्रामपंचायत यांच्या ताब्यात देऊन त्यांच्या मदतीने सरकारी पंचां समक्ष अंत्यविधी करण्यात आलेला आहे.सदर बाबत राहुरी पोलिसांच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे,उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोहेकॉ.सुरज गायकवाड,राहुल यादव,शकूर सय्यद,अशोक शिंदे,पोकॉ.गणेश लिपणे,अंकुश भोसले,प्रमोद ढाकणे,नदीम शेख, सतीश कुऱ्हाडे,अजिनाथ पाखरे,गोवर्धन कदम.मपोकॉ. मीना नाचन,वंदना पवार, शिवानी गायकवाड,अंजली गुरवे यांनी केली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!