वनाधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे शिबलापूर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याची सुटका

Cityline Media
0

​आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील 
 शिबलापुर येथील शेतकरी शामराव पाबळ यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या अंदाजे दीड ते दोन महिन्यांच्या बिबट्याच्या बछड्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले.
ही घटना शिबलापूर येथील शामराव पाबळ यांच्या शेतात घडली.श्री. पाबळ हे आपली मोटार चालू करण्यासाठी विहिरीकडे गेले असता,त्यांना विहिरीतून काहीतरी आवाज ऐकू आला.जवळ जाऊन पाहिले असता त्यांना बिबट्याचा एक छोटा बछडा विहिरीत पडलेला दिसला.तो रात्रीच्या वेळी भक्षाच्या शोधात असेल अशी शंका त्यांना आली त्यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून वनविभागाचे अधिकारी मंडपे, सूळ, गागरे आणि इतर सहकाऱ्यांशी संपर्क साधला.

माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक बचावकार्य सुरू केले.विहिरीतून बछड्याला सुखरूप बाहेर काढल्यानंतर त्याला निसर्गात सोडण्यात आले. बछड्याला सोडल्यामुळे त्याची आई (मादी बिबट्या) हिंसक होण्याची शक्यता होती,मात्र बछड्याने तात्काळ निसर्गात पलायन केल्याने वनाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. 

​वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या कार्य तत्परतेमुळे बछड्याचे प्राण वाचले.या प्रसंगी विनायक थोरात,बाळासाहेब पाबळ,पानोडीचे उपसरपंच विक्रम थोरात आणि इतर अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!