नाशिक दिनकर गायकवाड सुरगाणा तालुक्यातील
बोरगाव (उंबरपाडा दि.) येथील महाराष्ट्र सीमावर्ती चेकपोस्ट भागातील नागरिक व प्रवाशांना मूलभूत सुविधांच्या अभावामुळे समस्यांना सामोरे जावे लागत आहे, या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आहे. या पार्श्वभूमीवर सुरगाणा तालुक्यातील सुज्ञ नागरिकांनी जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे निवेदन सादर केले.
चेकपोस्ट परिसरात दिशादर्शक फलकांचा अभाव असल्यामुळे अनेक वेळा वाहनचालक चुकीच्या दिशेने जातात व त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो,परिसरात शौचालय, पिण्याचे पाणी,बीज तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी कोणताही हेल्पडेस्क वा आपत्कालीन संपर्क क्रमांक यांसारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन नाही आणि काही
कर्मचाऱ्यांकडून स्थानिक नागरिक व प्रवाशांना विनाकारण त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
याबाबत उपजिल्हाधिकारी राजपूत यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी समस्यांचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ कार्यवाहीसाठी संबंधित
विभागांना निर्देश दिल्याचे समजते. विशेषतः गैरवर्तन करणाऱ्या कर्मचा-यांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक नागरिक व प्रवाशांनी याबाबत सकारात्मक पावले उचलल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून प्रशासनाने त्वरित उपाययो जना करून या भागातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सदर निवेदन सुरगाणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या पुढाकाराने देण्यात आले. समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी यावेळी उपस्थित होते.
