शेतात पडलेल्या उच्च दाबाच्या विद्युत तारेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेशगाव वाघेरा विनायकनगर येथील भास्कर जीवा महाले (३३) यास शेतात पडलेल्या उच्च दाबाच्या विद्युत तारेचा शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आंबोली येथील भात शेतीचे निंदनीचे काम करण्यासाठी काम करण्यासाठी भास्कर जीवा महाले हा गणेशगाव येथून येत असे.उच्च दाबाची मुख्य लाईन तार शेतात पडली असल्याने त्याला वीजेची तार दिसून आली नाही. सुट्टी झाल्याने तो शेतातून बाहेर पडत असताना ही घटना घडली. हा प्रकार समजताच गणेशगाव विनायकनगरचे पोलीस पाटील जयराम महादू महाले यांनी तात्काळ त्र्यंबकेश्वर पोलिसांना माहिती कळविली.

घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी आपल्या सहक एक या सह घटनास्थळी पोहोचले.त्यात कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले त्यानंतर शवविच्छेदन करून त्याच्यावर गणेशनगर येथे शोकाकूल बातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!