धुळे सिटीलाईन न्यूज नेटवर्क धुळ्यातील इंजिनियरिंगचे शिक्षण घेणान्या एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या विद्याण्यनि गळफास घेत आयुष्य संपवल्याचे म्हटले जात आहे. तरुणाच्या आत्महत्येच्या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात खळबळ उडाली आहे.
छाया रेखांकन-ईश्वरी भागवत
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याच्या सावळदे जवळील एसव्हीकेराच्या निम्स कॉलेजमधील विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. कॉलेजच्या परिसरात विद्यार्थ्यांना राहण्यासाठी हॉस्टेलची सोय आहे. या हॉस्टेलमध्ये गळफास घेत या विद्याध्यनि स्वतःचा जीव घेतला.आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये आत्महत्या करणान्या इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांचे नाव अथर्व राजपुरोहित असे आहे. तो निम्स येथे कॉम्प्युटर इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होता. अथर्व राजपुरोहित हा मूळचा मध्यप्रदेश राज्यातील खरगोन येथील रहिवासी आहे.या घटनेनंतर घटनास्थळी पोहोचून शिरपूर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
धुळे जिल्ह्यातील सावळदे जवळील एसव्हीकेएमच्या निम्स कॉलेजमधील विद्याव्याने आत्महत्या केल्याचे वृतसमोर आले आहे. त्याने हॉस्टेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली, वा विद्याध्यनि आत्महत्या का केली याचे कारण अजूनही समोर आलेले नाही. या घटनेमुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
