फसवणूक प्रकरणातील फरार आरोपी अखेर सुपा येथुन जेरबंद

Cityline Media
0
स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई.
अहिल्यानगर प्रतिनिधी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे,  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किरणकुमार कबाडी, यांना अहिल्यानगर जिल्हयातील पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील पाहिजे व फरार आरोपीतांचा शोध घेऊन कारवाई आदेश दिले होते.
पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे समीर अभंग,रमेश गांगर्डे,भाग्यश्री भिटे, भिमराज खर्से अशांचे पथक तयार करुन आर्थिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचेकडे तपासावर असलेला गुन्हा,श्रीगोंदा पोलीस ठाणे गु.र.नं.४७३ /२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६3(२), ३१६(५), ३१८(२), ३१८(४), ३(५) सहा एम.पी.आय.डी.कायदा कलम ३ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेऊन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.

१६ नोव्हेंबर  रोजी गुन्हे शाखेचे पथकाने श्रीगोंदा पोलीस ठाणे येथील वरील गुन्ह्यात पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना पथकास बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि,वरील गुन्ह्यातील आरोपी नामे विक्रम बबन गाडीलकर रा.वाघुंडे बुद्रुक ता.पारनेर हा सुपा परिसरात आलेला आहे. पथकाने मिळालेल्या माहितीनुसार सुपा परिसरात जावुन, व्यावसायिक कौशल्य वापरुन,आरोपीस ताब्यात घेऊन, त्याचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव विक्रम बबन गाडीलकर वय - ४२ वर्षे रा.माळवाडी, वाघुंडे बुद्रुक  ता.पारनेर असे असल्याचे सांगीतले आहे.
 
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस श्रीगोंदा पोलीस ठाणे गु.र.नं.४७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६(२), ३१६(५), ३१८(२), ३१८(४), ३(५) सहा एम. पी. आय.डी.कायदा कलम ३ प्रमाणे दाखल गुन्ह्यांचे तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथे हजर करण्यात आलेले आहे. पुढील कार्यवाही आर्थिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर  हे करीत आहे. 

सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!