दिंडोरीत ना.नरहरी सीताराम झिरवाळ ट्रस्ट कडून रुग्णवाहिकेसाठी साहित्य वाटप

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयातील गर्भवती महिला व शिशुचे सेवेसाठी असणारी १०२ रुग्णवाहीका ही खराब बॅटरी व चोपडे झालेले टायर यामुळे रुग्णवाहिकाच आजारी पडली होती, वारंवार शासन स्तरावर पाठपुरावा करूनही दुरुस्ती होत नव्हती.
अखेर ना.नरहरी सीताराम झिरवाळ चॅरिटेबलच्या गणेश मंडळाने पुढाकार घेत या रुग्णवाहिकेला नवीन बॅटरी व टायर दिले असून शासन नाही पण गणपती बाप्पा पावले व रुग्णवाहिकेला बॅटरी बनवीन टायर मिळाले आहे.

बॅटरी खराब झाल्याने धक्का देत रुग्णवाहीका सुरु करावी लागत होती तर चोपडे टायरने कुठेही रस्त्यात रुग्णवाहीका पंक्चर होत होती ही अडचण क्रिशा फाऊंडेशन व गोकूळ

झिरवाळ बुथ फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी दूर केली. येथील गणेश मंडळाची आरती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर काळे, सहाय्यक निबंधक वैभव मोराडे यांचे हस्ते झाली. त्यानंतर रुग्णवाहिकेस बॅटरी, टायर सुपूर्द करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास मवाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिकेत बोरस्ते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रतीक जाधव, विक्रम मवाळ, उज्वला उगले, जहीर शेख,

मंगेश घोलप, सचिन काकड, योगेश खरात, समाधान जाधव आदी उपस्थित होते. यावेळी रुग्णालयातर्फे ज्ञानज्योती क्लासचे विद्यार्थ्यांचे रक्त हे तपासणी करण्यात आली. यावेळी रक्त तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर काळे, डॉ. समीर भालेराव, डॉ. राजेंद्र चौधरी, डॉ. सुरेखा पांगरे, डॉ. रिना चारंभे, वाहन चालक तुषार पांडव आदीनी विद्याथ्यांची शिक्षकांची रक्त तपासणी केली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!