जळगाव सिटीलाईन न्यूज नेटवर्क घरगुती वादातून मुलाने स्वतःच्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी हातोडी टाकून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना नुकतीच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील शिरूड नाका परिसरात घडली.
राजेंद्र दत्तात्रय रासने, वय ६४ वर्ष, हे जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले.जखमी राजेंद्र रासने यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.राजेंद्र रासने यांचा मुलगा भूषण रासने (वय ३०) यानेच वडिलांच्या डोक्यात लोखंडी हातोडी मारून खून केला.
फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून नमुने जप्त केले असून खूनासाठी वापरलेली लोखंडी हातोडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
